Budget Smartwatch: boAt ने भारतात Watch Zenit नावाचा Smartwatch लाँच केला आहे. या स्मार्टवॉचची किंमत 1,999 रुपये ठेवली आहे. हा वॉच ब्लू, ग्रे आणि ब्लॅक रंगात अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. याची विक्री 11 नोव्हेंबरपासून सुरु होईल. या वॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस देण्यात आले आहेत.
boAt Watch Zenit चे स्पेसिफिकेशन
boAt Watch Zenit मध्ये वर्तुळाकार डायल देण्यात आला आहे. ज्यात 1.3 इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे. या वॉचमधील उजवीकडील दोन बटन नेव्हिगेशनसह इतर अनेक फंक्शनसाठी वापरता येतात. यातील 100 पेक्षा जास्त वॉच फेसच्या मदतीने हा वॉच कस्टमाइज करता येईल.
या वॉचमध्ये IP67 रेटिंग देण्यात आली आहे, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून याचे संरक्षण होते. या बजेट फ्रेंडली स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कॅलरी काऊंटर, स्टेप्स मॉनिटर, डिस्टन्स कव्हर्ड आणि स्लीप पॅटर्न मॉनिटरिंग फीचर देखील देण्यात आले आहेत.
या वॉचमध्ये फुटबॉल आणि क्रिकेटसह सात स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमधील म्यूजिक आणि कॅमेरा देखील कंट्रोल करता येईल. वॉचमध्ये सोशल मीडिया नोटिफिकेशन्ससह मेसेज आणि इनकमिंग कॉल्स देखील मिळतील. हा वॉच एकदा फुल चार्ज केल्यावर सात दिवस वापरता येईल.