- मुक्ता चैतन्य, समाज माध्यमाच्या अभ्यासक, muktaachaitanya@gmail.comसायबर बुलिंग किंवा स्टॉकिंग, गोपनीयतेवर हल्ला किंवा इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी, आयडेंटिटी थेफ्ट, सिसॅम किंवा चाईल्ड सेक्शुअल ऍब्युसीव्ह मटेरियल, सेक्स टेप रॅकेट या सायबर धोक्यांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे.१) खासगी माहिती सायबर स्पेसमध्ये शेअर करू नका. २) मुलांचा खासगी तपशील, त्यांच्या शाळांच्या/क्लासेसच्या वेळा, आवडीनिवडी, त्यांचं रुटीन शेअर करू नका.३) घर कितव्या मजल्यावर आहे, दारं किती आहेत, घरात कधी कोण असतं यासारखे तपशील चुकूनही स्वतः शेअर करू नका आणि हे मुलांनाही सांगा. ४) पासवर्ड म्हणजे स्वतःच नाव, मुलांचं, जोडीदाराचं नाव, जन्म तारखा, लग्नाची तारीख नव्हे. पासवर्ड क्रॅक करायला अवघड जाईल इतपत विचित्र असावा. ५) अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करताना काळजी घ्या. खासगी तपशील, फोटो मागितले तर ती धोक्याची सूचना माना. पासपोर्ट, आधार, पॅनकार्ड किंवा इतरही कागदपत्रांचे तपशील देऊ नका. ६) अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका. सेक्स टेप रॅकेटमध्ये व्हिडीओ कॉल ब्लॅकमेलिंगचा प्रकार सर्वाधिक होतो. ७) मुलांचे फोटो शेअर करताना अतिसतर्क असा. मुलांच्या फोटोंना प्रचंड लाईक्स, लव्ह, कॉमेंट्स मिळतात, पण त्या फोटोंचा दुरुपयोग होणार नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. मुलांचे आंघोळ करतानाचे, नंगेपुंगे फोटो, कितीही क्युट वाटले तरी चुकूनही शेअर करू नका. ८) आपल्या नावाचा दुरुपयोग होतोय, असं लक्षात आल्यास सायबर पोलिसांची मदत घ्या. सोशल मीडियावर अकाऊंट हॅक झाल्याची शंका आली तर लगेच पासवर्ड बदलून पोलिसांकडे तक्रार नोंदवा. ९) कुणीही ऑनलाईन स्पेसमध्ये असभ्य वर्तन करत असेल तर लगेच रोखा. विरोध झाला नाही की बुलिंग करणाऱ्याची हिंमत वाढते. चेष्टा कुठे संपते आणि बुलिंग कुठे सुरु होतं हे लक्षात घ्या. त्याची सीमारेषा समजून घ्या. १०) एकदा एखादी गोष्ट ऑनलाईन गेली की ती तिथून डिलीट होत नाही. त्यामुळे अपलोड करताना आपण का करतोय? कशासाठी करतोय? त्याचा फायदा-तोटा काय? त्यात किती वेळ जाणार? हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा.
बुलिंग, स्टॉकिंग आणि तुम्ही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 5:18 AM