नवी दिल्ली : रिलायन्सजिओने आज गिगाफायबर नेटवर्कची मोठी घोषणा केली आहे. या लॉटरीमध्ये प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. याचसोबत आणखी एका स्कीममध्ये मोफत 4के टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स मिळणार असून अन्य अनेक सेवाही एकाच प्लॅनमध्ये मिळणार आहेत. याचसोबत जिओने बंपर भरतीही करण्याची घोषणा केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. येत्या 5 सप्टेंबरला जिओला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत.जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
जियोने सध्या 50 लाख घरांमध्ये गिगाफायबर सेवा पोहेचवली आहे. याचसोबत भारतातील 1600 शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे. यामुळे रिलायन्सला मोठ्या प्रमाणावर इंजिनिअर लागणार आहेत. सध्या जिओमध्ये 6 हजार इंजिनिअर काम करत आहेत. आणखी 15 हजार इंजिनिअर कंपनीला लागणार आहे. पुढील 12 महिन्यांत गिगाफायबरचे भक्कम जाळे उभारले जाणार आहे. तसेच मायक्रोसॉफ्टसोबत मिळून वर्ल्ड क्लास डेटा सेंटर उभारले जाणार आहे.
रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही...
स्टार्टअपसाठी काय?स्टार्टअप कंपन्यांसाठी क्लाऊड सर्व्हिस मोफत असणार आहे. ही सेवा 1 जानेवारीपासून दिली जाईल. याशिवाय लघू, मध्यम व्यवसाय जोडणीसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी यापुढे 1500 रुपये खर्च येणार आहे. ब्रॉडबँड सर्व्हिस इन्स्टॉल करण्यासाठी फारतर तासभर लागणार आहे.
लहान मुलांना फायदाजिओ गिगा टीव्हीमुळे ग्राहक व्हिडिओ कॉलिंग करू शकणार आहे. यावर जगातील सर्वात चांगली शैक्षणिक माहिती पुरविली जाणार आहे. यामुळे मुलांना शिक्षकाशिवाय घरबसल्याच अभ्यास करता येणार आहे. याशिवाय डॉक्टरही दूर बसून पेशंटवर इलाज करू शकणार आहेत.