कॅवियार (Caviar) ब्रँड स्मार्टफोनचे कस्टमाईज्ड लक्झरी व्हेरिअंट तयार करण्यात जगभरात प्रसिद्ध आहे. कॅवियार आता iPhone चे प्रो मॉडेल्सची (iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max) कस्टमाईज सीरिज घेऊन आली आहे. iPhone ची ही लेटेस्ट सीरिज कस्टमाईज्ड व्हर्जन Rolex Watch च्या निरनिराळ्या मॉडेल्सपासून प्रेरित आहे.18 कॅरेट व्हाईट गोल्डचा वापरकंपनीनं iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या स्मार्टफोन्सचे एकूण पाच व्हर्जन लाँच केले आहेत. याची किंमत 6540 डॉलर्सपासून 25080 डॉलर्स म्हणजे 4.82 लाखांपासून 18.48 लाखांपर्यंत आहे. यामध्ये सर्वात महाग Rolex Cellini कलेक्शनशी इन्स्पायर्ड आहे. iPhone 13 Pro च्या कस्टम सीरिजमध्ये 18 कॅरेट गोल्डचा वापर करण्यात आला आहे. या डिव्हाईसची फ्रेम 18 कॅरेट गोल्डनं कस्टमाईज करण्यात आली आहे. या व्हेरिअंटची किंमत 18.48 लाखांच्या जवळ आहे.
उल्कांचाही वापरदुसरा कस्टमाईज्ड स्मार्टफोन Rolex Cosmograph Daytona वॉच सीरिजपासून इन्स्पायर्ड आहे. iPhone 13 Pro सीरिजच्या या कस्टम व्हेरिअंटच्या वरील भागावर उल्का पिंडाचा वापर करण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याची किंमत 7060 डॉलर्स म्हणजे जवळपास 5.2 लाख रूपये इतकी आहे. कस्टम सीरिजचा आणखी एक स्मार्टफोन Rolex Sky Dweller सीरिजपासून इन्स्पायर्ड आहे. या कस्टम डिव्हाईसमध्ये ब्लॅक PVD कोटींगसह हाय इम्पॅक्ट टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. याची किंमत 6910 डॉलर्स म्हणजेच जवळपास 5.10 लाख रूपयांपासून सुरू होते.
iPhone 13 Pro चे ऑलिव्ह रेज मॉडेल Rolex Datejust वॉच डिझाईनपासून इन्स्पायर्ड आहेय याच्या वरील भाग हा अॅल्युमिनिअमपासून तयार करण्यात आला आहे आणि तो कलर ऑलिव्ह ग्रीन आहे. याची किंमत 6830 डॉलर्स म्हणजेच 5.03 लाख इतरी आहे. कस्टमाईज सीरिजच्या अखेरच्या फोनची किंमत 6540 डॉलर्स म्हणजेच 4.82 लाख रूपये इतकी आहे.