शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Apple युजर्सना मोठा धोका! लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; केंद्राने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 12:59 PM

केंद्र सरकारने सायबर क्राईमबाबत आयटी सेलला अलर्ट केलं आहे. यासोबतच  iPhones, iPads आणि Apple च्या सर्व युजर्ससाठी इशारा देण्यात आला आहे.

जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने सायबर क्राईमबाबत आयटी सेलला अलर्ट केलं आहे. यासोबतच  iPhones, iPads आणि Apple च्या सर्व युजर्ससाठी इशारा देण्यात आला आहे.

Apple युजर्सना अलर्ट करताना, त्यांनी सावध राहावं, अन्यथा स्पॅम कॉल, मेसेज किंवा फोन स्पूफिंगद्वारे महत्त्वाची माहिती आणि डेटा लीक होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने जारी केला अलर्ट

केंद्र सरकारच्या सिक्योरिटी एडवाजर, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT) याबाबत एक ॲडव्हायझरी जारी केली असून ही परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सीईआरटीच्या ॲडव्हायझरीनुसार, Apple उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे अटॅकर्स संवेदनशील माहितीपर्यंत पोहचू शकतात.

सीईआरटीचे म्हणणं आहे की, हॅकर्स फोनमधील महत्त्वाची माहिती लीक करू शकतात. यासह सिक्योरिटी बॅरियर्स पार करणे, सर्व्हिस डिनाय करणं आणि सिस्टमवर स्पूफिंग अटॅकना देखील परवानगी दिली जाऊ शकते.

कोणत्या सॉफ्टवेअर युजर्सना समस्या?

Apple सॉफ्टवेअरच्या सीरीजमध्ये त्रुटी आढळल्या आहेत त्यामध्ये १७.६ आणि १६.७.९ पूर्वीच्या iOS आणि iPadOS सीरीज, १४.६ पूर्वीच्या macOS सीरीज, १३.६.८ पूर्वीच्या macOS Ventura सीरीज यांचा समावेश आहे. याशिवाय, १२.७.६ पूर्वीची macOS Monterey सीरीज, १२.७.६ पूर्वीची watchOS सीरीज १०.६, १७.६ पूर्वीची tvOS सीरीज आणि इतर सीरीजचा समावेश आहे.

यापूर्वी, Apple ने गेल्या आठवड्यातच आपले लेटेस्ट सिक्योरिटी अपडेट्स शेअर केले होते आणि लेटेस्ट व्हर्जन ऑफिशियल पोर्टलवर अपलोड केलं आहे, जे सर्व युजर्स वाचू शकतात. आता CERT-In ने सर्व युजर्सना Apple द्वारे अपलोड केलेल्या आवश्यक सॉफ्टवेअरचे अपडेट लागू करण्यास सांगितलं आहे. 

टॅग्स :Apple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple Incअॅपलcyber crimeसायबर क्राइम