नवी दिल्ली – देशात वाढणारं कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य सेतू नावाचा ट्रेसिंग अॅप आणला. मात्र अॅपच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून भारतीयांना डेटा लीक करण्याची धमकीही एका हॅकरने दिली होती. त्यानंतर सरकारने अॅपचा ओपन सोर्स बनवला असून आरोग्य सेतूसाठी बग बाउंटी प्रोग्रामची घोषणा देखील केली आहे.
या कार्यक्रमानुसार अॅपमधील असुरक्षितता निदर्शनास आणणाऱ्यास ४ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. बग बाउंटी कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. ज्या कोणाला या अॅपमध्ये कोणीतीही त्रुटी आढळून आली तर त्या व्यक्तीने “सिक्युरिटी व्हेनेरबिलिटी रिपोर्ट” या विषयाअंतर्गत bugbounty@nic.in वर ईमेल पाठवू शकतात. तसेच कोड सुधारणेबाबत कोणाला काही सुचवायचे असेल तरीही ईमेल पाठवण्याचं आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या संशोधकांना अॅपमधील कोणतीही असुरक्षितता सापडली, त्यांचे निराकरण होण्यापूर्वी जाहीरपणे हे उघड करण्याची परवानगी नाही. तसेच, हा बग बाऊंटी प्रोग्राममध्ये आरोग्य सेतू टीम, नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय (मीटीवाय) मधील कर्मचार्यांना सहभागी होता येणार नाही.
हा कार्यक्रम भारतात राहणार्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. भारताबाहेरील रहिवासी देखील त्यात सबमिट करू शकतात, परंतु ते कोणत्याही बक्षीस पात्र ठरणार नाहीत. तथापि, त्यांना शॉर्टलिस्ट केल्यावर प्रमाणपत्र मिळेल. हा कार्यक्रम २७ मे ते २६ जून या कालावधीत चालणार आहे. तसेच अॅपची सुरक्षा सुधारणे आणि त्याला प्रोत्साहन देणे त्याचे उद्दीष्ट आहे. अॅपमध्ये असुरक्षितता आढळल्यास १ लाख रुपये मिळतील. त्याचसोबत कोड सुधारणा त्यासाठी १ लाख अशाप्रकारे ४ लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी नीती आयोगाकडून आरोग्य सेतू अॅप २ एप्रिल २०२० रोजी लॉन्च केले होते, यामाध्यमातून लोकांना आपल्या आजूबाजूला कोरोना संक्रमित व्यक्ती नाही हे माहिती होते. या अॅपमध्ये कोरोनाशी संबंधित बरीच महत्त्वाची अपडेट देण्यात आली असून आता या अॅपच्या मदतीने ऑनलाईन वैद्यकीय सल्लेही घेता येतील. अॅपमध्ये जोडलेली आरोग्य सेतू मित्र नावाची सुविधा वापरुन टेलिमेडिसिनची सुविधा (फोनद्वारे डॉक्टरांचा सल्ला) घेता येईल. आरोग्य सेतू अॅप १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने एक ट्विट करून आरोग्य सेतू अॅपवरून भारतीयांची माहिती उघड होण्याचा दावा केला होता. त्यामुळे आरोग्य सेतू अॅपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यानंतर हा अॅप खासगी संरक्षण, सुरक्षा आणि डेटा सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे मजबूत आहे असं केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भीकेला लागलेल्या पाकचे भारताविरुद्ध षडयंत्र सुरुच; झाकीर नाईकच्या मदतीसाठी घेतोय पुढाकार
“आज देशाकडे सक्षम नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही”
शिवसेना नेत्याच्या हत्येमागे धक्कादायक खुलासा; भाजपा नेत्यासह ४ आरोपींना केली अटक
तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा
वुहानमधील ‘या’ कारचा फोटो का होतोय व्हायरल?; सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर