इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अलीकडेच एक इशारा दिला आहे आणि हा इशारा विशेषतः अँड्रॉइड युजर्ससाठी आहे. मग तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल किंवा अँड्रॉइड टॅबलेट... हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. CERT-In इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
CERT-In नुसार, Android OS मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत आणि याचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमची महत्त्वाची माहिती आणि डेटा काढू शकतात. अशा परिस्थितीत अँड्रॉइडच्या कोणत्या व्हर्जनला धोका आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यात Android 12, Android 12L, Android 13 आणि Android 14 चा समावेश आहे.
CERT-In मते, या समस्या अँड्रॉइडच्या फ्रेमवर्क, सिस्टम, गुगल प्ले सिस्टम अपडेट्स, कर्नल, आर्म कंपोनेंटस, इमॅजिनेशन टेक्नॉलॉजी आणि क्वालकॉमच्या क्लोज-सोर्स कंपोनेंट्समधील त्रुटींमुळे आहेत.
या त्रुटींमुळे, जर कोणत्याही हॅकरला तुमचा फोन हॅक करायचा असेल तर त्याच्यासाठी ते खूप सोपे होईल. तुमचा फोन हॅक केल्यानंतर, हॅकर तुमच्या फोनमधील डेटा चोरू शकतो आणि तो डेटा डार्क वेबवर विकू शकतो. यासोबतच हॅकर तुमच्या फोनमध्ये डिनायल ऑफ सर्व्हिस कंडिशन देखील सक्रिय करू शकतो. त्यामुळे CERT-In ने युजर्सना लवकरात लवकर सिक्युरिटी पॅच अपडेट करण्यास सांगितलं आहे.
फोन अपडेट करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
- सर्वात आधी तुमच्या फोनची Setting ओपन करा.- त्यात सॉफ्टवेअर अपडेट्स शोधा आणि ते उघडा.- यानंतर Check for Updates वर क्लिक करा.- जर 'Update available' म्हणजे अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड करा.- अपडेट डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा.- इन्स्टॉल केल्यानंतर फोन रीस्टार्ट करा. यानंतर तुमचा फोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.