सोनी कंपनीच्या तोडीची अफलातून तंत्रज्ञान विकसित करणारी दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने जगातील पहिलाच कॅलेंडरसारखा गुंडाळणारा टीव्ही सीईएसमध्ये दाखविला. हा टीव्ही ओएलईडी टेक्नॉलॉजी सोबत येणार आहे.
एलजीचा हा टीव्ही एका छोट्याशा साऊंड बारमध्ये जेव्हा आपल्याला टीव्ही पाहायचा नसेल तोपर्यंत ठेवता येतो. जेव्हा टीव्ही पाहायचा असेल तेव्हा एका बटनावर तो हळू हळू वर येऊ लागतो. कंपनीने गेल्या वर्षीच्याच सीईएसमध्ये या टीव्हीचे कन्सेप्ट दाखविण्यात आली होती. कंपनीने वर्षभरात या टीव्हीमध्ये मोठे संशोधन करून आणखी चांगले बनविले आहे.
एलजीचा हा जागा वाचविणारा टीव्ही OLED TV R या नावाने प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता. 65 इंचाचा हा टीव्ही सिग्नेचर ओएलईडी टीव्ही पुढील वर्षी बाजारात येणार आहे.
एलजीने सांगितले की, कंपनीने आणलेला हा गुंडाळणारा टीव्ही बाजारातील सारा खेळच पालटून टाकेल. हा टीव्ही पाहणाऱ्यांना भींतीच्या सीमांपासून मुक्त करेल. घरामध्ये यापुढे टीव्ही ठेवण्यासाठी जागा आरक्षित ठेवावी लागणार नाही. जेव्हा टीव्ही पाहायचा नसेल तेव्हा हा टीव्ही एका साऊंड बारमध्ये गुंडाळून ठेवता येतो.
एलजीने लाँच केलेल्या या 4K OLED टीव्हीमध्ये 65 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या टीव्हीला आपल्या गरजेनुसार रोल अप-डाऊन करता येते. हा टीव्ही केवळ 10 सेकंदात गुंडाळला जाऊन साऊंड बारमध्ये रुपांतरीत होतो. यामुळे हा टीव्ही कुठेही ठेवता येणार आहे.
वेगळ्या अॅमेझऑन अॅलेक्साची गरज नाही...हा टीव्ही असल्यास वेगळ्या अॅमेझॉन अॅलेक्साची गरज भासणार नाही. कारण या टीव्हीमध्ये अॅलेक्सा इनबिल्ट आहे. टीव्हीच्या रिमोटवरील बटनावरून अॅलेक्सा वापरता येणार आहे. हा टीव्ही वेबओएसवर चालतो.
लाईन मोड म्हणजे काय? या टीव्हीमध्ये एक लाईन मोडही देण्यात आला आहे. म्हणजेच हा टीव्ही चालू केल्यानंतर या मोडवर टीव्हीचा केवळ एक चतुर्थांश भागच बाहेर येणार आहे. या मोडद्वारे गाणी ऐकणे, व्हॉईस असिस्टंस आणि स्मार्टहोमची अन्य उपकरणे नियंत्रित करता येणार आहेत.