भारतीय म्हणून हिनविण्याची एकही संधी पाश्चात्य देश सोडत नाही. रोल्स रॉयस, फोर्ड अशा भल्या भल्या कंपन्यांना भारतीयांनी पाणी पाजलेले आहे. राजाने रोल्स रॉयसच्या गाड्या कचरा उचलायला ठेवल्या होत्या, तर टाटांनी फोर्डकडून मोठी कंपनीच विकत घेतलेली. आता पुन्हा एकदा नुकत्याच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या चॅटजीपीटीच्या कंपनीच्या मालकाने भारताचा अपमान करण्याची हिंमत केली आहे.
ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटी बनविणारा सॅम ऑल्टमनने काही दिवसांपूर्वी भारताचा दौरा केला होता. तेव्हा तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटला होता. यानंतर एका कार्यक्रमात भारतीयांचा अपमान केला होता. भारतीयांसाठी चॅटजीपीटी सारखे टूल बनविणे अशक्य आहे, जर ते तसे करायला गेले तर फेल होतील, असे ऑल्टमनने म्हटले होते. याला टेक महिंद्राने आव्हान दिले आहे.
गुगल इंडियाचे माजी सीईओ राजन आनंदन यांनी ऑल्टमनला भारतात चॅटजीपीटी सारखे ओपनएआय आणि चॅटजीपीटी सारखे टूल बनविण्यासाठी सल्ला मागितला होता. यावर त्याने भारतात पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. स्टार्टअपसाठी एआय मॉडेल तयार करणे केवळ आव्हानात्मक नाही तर जवळजवळ अशक्य आहे. कारण OpenAI ने आधीच ChatGPT तयार केले आहे. एआयसारखी साधने तयार करण्यासाठी भारतीयांकडे संसाधनांचा आणि ज्ञानाचा अभाव आहे, असे त्याने म्हटले होते.
टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी सॅम ऑल्टमनच्या या वक्तव्यावर उत्तर दिले आहे. त्यांनी ओल्टमनचे आव्हान स्वीकारल्याचे ट्विट केले आहे. भारताला 5000 वर्षांचा उद्योजकतेचा इतिहास आहे. मंगळ मोहिमेबाबत अमेरिकनांनीही भारतीयांची खिल्ली उडवली होती. भारताने UPI सारखी पेमेंट सिस्टीम तयार केली आहे, जी त्यांचाच देश अमेरिका स्वीकारू शकते, अशा शब्दांत आव्हान स्वीकारले आहे.