चंद्रयान ३ च्या लँडिंगसाठी इस्रोच्या कंट्रोल रुममध्ये धावपळ सुरु झाली आहे. थोड्याच वेळात चंद्रयानाची लँडिंगची प्रोसेस सुरु होणार आहे. चंद्रयान ३ चे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
चंद्रयान -३ लाईव्ह स्ट्रिमिंग आज सायंकाळी 5.20 मिनिटांपासून सुरु होणार आहे. हे लँडिंग इस्रोच्या वेबसाईटवर लाईव्ह केले जाणार आहे. तसेच इस्रोच्या युट्यूब चॅनल, फेसबुक आणि पब्लिक ब्रॉडकास्टर डीडी नॅशनलवर लाईव्ह दाखविले जाणार आहे. ही वेळ ५.२७ मिनिटांपासूनची आहे.
कुठे पहाल...इस्रोच्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...
इस्रोचा युट्यूब चॅनलवर इथे पहा...
- पहिला टप्पा: या टप्प्यात, चंद्रयानाचे पृष्ठभागापासूनचे 30 किमीचे अंतर 7.5 किमीपर्यंत कमी केले जाईल.
- दुसरा टप्पा: अंतर 6.8 किमी पर्यंत आणले जाईल. या टप्प्यापर्यंत, यानाचा वेग 350 मीटर प्रति सेकंद असेल, म्हणजेच सुरुवातीच्या तुलनेत साडेचार पट कमी केला जाणार आहे.
- तिसरा टप्पा: हे वाहन चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 800 मीटर उंचीवर आणले जाईल. येथून दोन थ्रस्टर इंजिन टेक ऑफ करतील. या टप्प्यात, यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या अगदी जवळ पोहोचेल.
- चौथा टप्पा: या टप्प्यात, यान पृष्ठभागाच्या 150 मीटर जवळ आणले जाईल. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात, म्हणजे व्हर्टिकल लँडिंग.
- पाचवा टप्पा: या चरणात ऑनबोर्ड सेन्सर्स आणि कॅमेर्यांचे थेट इनपुट आधीपासूनच संग्रहित संदर्भ डेटाशी जुळविण्यात येईल. या डेटामध्ये 3,900 छायाचित्रे समाविष्ट असतील. यानंतरच थेट लँडिंग केल्यास लँडिंग यशस्वी होईल की नाही हे ठरवले जाईल. लँडिंग साइट अनुकूल नाही असे वाटल्यास, ते थोडेसे आजुबाजुला वळविले जाईल. या टप्प्यात, यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या 60 मीटर एवढ्या जवळ आणले जाईल.
- सहावा टप्पा: लँडिंगचा हा शेवटचा टप्पा आहे, ज्यामध्ये लँडर थेट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल.