Who is Prafulla Dhariwal: ChatGPT सारखे तंत्रज्ञान विकसित करणार्या OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी कंपनीचे लेटेस्ट फ्लॅगशिप AI मॉडेल GPT-4o यशस्वीरित्या लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे, या लॉन्चिंगनंतर त्यांनी भारताच्या प्रफुल्ल धारीवाल (Prafulla Dhariwal) याला याचे श्रेय दिले. ऑल्टमॅन यांनी एक्सवर घोषणा केली की, प्रफुल्ल धारीवालशिवाय GPT-4o शक्य नव्हते. त्यांच्या या पोस्टनंतर धारीवाल कोण आहे, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.
कोण आहे प्रफुल्ल धारीवाल ?प्रफुल्ल धारीवाल पुण्याचा रहिवासी असून, अनेक वर्षांपासून आपल्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक कामगिरीसाठी ओळखला जाता. 2009 मध्ये त्याने भारत सरकारची राष्ट्रीय प्रतिभा शोध शिष्यवृत्ती जिंकली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉमी ऑलिम्पियाडमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. याशिवाय, 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय मॅथ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले.
धारीवाल अभ्यासात अतिशय हुशार होता. बारावीत त्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ(पीसीएम) विषयांत 300 पैकी 295 गुण मिळवले. एवढेच नाही, तर त्याने महाराष्ट्रातील MT-CET मध्ये 190 गुण आणि JEE-Mains मध्ये 360 पैकी 330 गुण मिळले. धारीवालची उत्कृष्ट कामगिरी पाहून 2013 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्याचा वार्षिक आबासाहेब नारायण स्मृती पुरस्काराने सन्मान केला.
असा सुरू झाला OpenAI चा प्रवासयानंतर धारीवालने मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) मधून कॉम्प्यूटर सायंस (मॅथमैटिक्स) मध्ये पदवी घेतली आणि 2016 मध्ये OpenAI कंपनीत रीसर्च इंटर्न म्हणून आपला प्रवास सुरू केला. यानंतर त्याने GPT-3, टेक्स्ट-टू-इमेज प्लॅटफॉर्म DALL-E 2, इनोव्हेटिव्ह म्यूजिक जनरेटर जूकबॉक्स आणि रिव्हर्सिबल जनरेटिव मॉडेल ग्लो मध्ये महत्वाची भूमिका बजावली.