CoolPad हे नाव सध्या जास्त चर्चेत नसलं तरी काही वर्षांपूर्वी या कंपनीनं भारतात अनेक भन्नाट हँडसेट सादर केले होते. आपल्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनसाठी ओळखली जाणारी या कंपनीनं सध्या फक्त चीनपुरते आपले हँडसेट मर्यादित ठेवले आहेत. नवीन Coolpad Cool 20s स्मार्टफोन 4500mAh ची बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.
Coolpad Cool 20s चे स्पेसिफिकेशन्स
किंमत जरी कमी असली तरी कंपनीनं Coolpad Cool 20s च्या स्पेसिफिकेशन्समध्ये कंजूसी केलेली दिसत नाही. Coolpad Cool 20s मध्ये 6.58 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टियरड्रॉप नॉच डिजाइन असलेला पॅनल फुल एचडी+ रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये 4,500mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. हा फोन Android 11 आधारित Cool OS 2.0 वर चालतो. या ड्युअल सिम 5G फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. डिवाइसच्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर बॅक पॅनलवर 50-मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेलला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो.
Coolpad Cool 20s ची किंमत
Coolpad Cool 20s स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत चीनमध्ये 999 युआन (सुमारे 11,600 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन फायरफ्लाय ब्लॅक, मून शॅडो व्हाईट आणि एज्योर ब्लू रंगात विकत घेता येईल. सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असलेला हा हँडसेट चीनमध्ये 17 जूनपासून विकत घेता येईल.