रिलायंस जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड प्लॅननी सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. काही वर्षे स्वस्त डेटा, कॉलिंगची सवय लावून आता परवडत नाही असे सांगत रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. आता तुम्हाला या खासगी कंपन्यांची सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी कमीतकमी १५० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. असे असताना सरकारी कंपनी बीएसएनएल ५० रुपयांत तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि २० दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे,
BSNL कडून ग्राहकांना फक्त 49 रुपयांमध्ये प्री-पेड प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्री-पेड प्लॅनची वैधता 20 दिवसांची आहे. बीएसएनएलच्या ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण एक जीबी डेटा दिला जातो. यासोबतच 100 लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.BSNL कडून ग्राहकांना 29 रुपयांचा प्री-पेड प्लॅन ऑफर केला जातो. या प्री-पेड प्लॅनमध्ये 5 दिवसांची वैधता आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. म्हणजे वापरकर्ते 29 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंग वापरू शकता.
BSNl द्वारे 24 रुपयांचे टॅरिफ व्हाउचर ऑफर केले जाते. यामध्ये यूजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच व्हॉईस कॉलिंगचाही आनंद घेता येईल. कॉलिंगसाठी तुम्हाला 20 पैसे प्रति मिनिट दराने शुल्क आकारले जाईल.