चीनच्या ओप्पोची उपकंपनी Realme ने 5G स्मार्टफोन बाजारात धमाका उडवून दिला आहे. मोटरोलाच्या नावावर असलेला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनचा खिताब काढून घेतला आहे. Realme ने आज V सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. (RealMe launches cheapest 5G supported Smartphone in China)
Realme V11 5G हा कंपनीचा आणखी एक परवडणारा 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Realme V11 5G च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत RMB 1,199 म्हणजेच 13,500 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत RMB 1,399 म्हणजेच 15,800 रुपये ठेवण्यात आली आहे. व्हायब्रेंट ब्लू आणि क्वाईट ग्रे कलरमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.
पेटीपॅक स्मार्टफोन, गॅझेट्स घेतल्या घेतल्या कोणती काळजी घ्यावी? जरूर पहा नाहीतर पस्तावाल...
या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटचा 6.52-इंच (720 x 1600 पिक्सल) IPS LCD डिस्प्ले देण्य़ात आला आहे. यामध्ये स्क्रीनच्या वरती वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. यामध्ये 5G नेटवर्क सपोर्टसाठी MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस वाढविता येणार आहे. 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगद्नारे वेगाने चार्ज करता येणार आहे.
गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर
या फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच य़ामध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 वर चालणारे Realme UI देण्यात आली आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साईडला देण्यात आला आहे. सध्य़ा हा फोन चीनमध्ये लाँच झालेला आहे. भारतातही लवकरच हा फोन य़ेणार आहे.
Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच
स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते. परंतु आता कंपनीनं Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. सध्या कंपनीनं भारतात हे फोन केव्हा लाँच केले जातील याची माहिती दिली आहे. परंतु याचा सेल केव्हापासून सुरू होईल याबाबत मात्र पुढील महिन्यातच माहिती देण्यात येणार आहे. मीडिया इनवाईट व्यतिरिक्त रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता भारतात लाँच केले जाणार असल्याची माहिती दिली.