स्मार्टफोनचे क्षेत्र वाढत असताना टीव्हीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. यामुळे या क्षेत्रातही दबदबा असलेल्या एलजी, सोनी, सॅमसंगच्या कंपन्यांना नवनवीन तंत्राज्ञानाचे टीव्ही आणावे लागत आहेत. अशातच अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या कमी किंमतीत या तीन कंपन्यांच्या तोडीचे स्मार्ट टीव्ही बाजारात आणत आहेत.
अशाच आयटेलने नवीन टीव्हींची रेंज सादर केली आहे. कंपनीने आपले नवीन टीव्ही L3265 (32-इंच) आणि L4365 (43-इंच) लॉन्च केले आहेत. itel L3265 आणि L4365 मॉडेल फ्रेमलेस डिझाइनसह येतात. itel L3265 मध्ये 250 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे तर itel L4365 मध्ये 300 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे.
हे टीव्ही वाइब्रेंट आणि ट्रू-लाइफ इमेज आणि कटिंग एज कलर टेक्नोलॉजीने युक्त आहेत. यामध्ये प्री-इंस्टॉल्ड OTT ऐप्स आणि इनबिल्ट क्रोमकास्ट आहे. टीव्हीसोबत स्लिम स्मार्ट रिमोट देखील चांगला अनुभव देतो.
itel L-सिरीज 32-इंच (HD रेडी) आणि 43-इंच (फुल HD) आकारात लॉन्च करण्यात आली आहे. हे टीव्ही Coolita ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. यामध्ये 512MB RAM सह 4GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. itel L3265 मध्ये 1.5GHz क्वाड कोअर प्रोसेसर आहे तर त्याचे दुसऱ्या मॉडेलमध्ये क्वाड कोर 1.8 GHz प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 24W बॉक्स स्पीकर देण्यात आला आहे. याशिवाय मोफत वॉल माउंट आणि इन्स्टॉलेशनसह एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
itel L3265 Smart TV ची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर itel L4365 ची किंमत 16,599 रुपये ठेवण्यात आली आहे.