आजकाल सारेच स्मार्ट होत चालले आहेत. आता वायफायची पोहोच गावागावात देखील झाली आहे. आणखी काही दिवसांनी गावांत ५जी सारखे नेटवर्कही मिळू लागेल. असे असताना तुमचा टीव्ही स्मार्ट नसेल तर? खूप पैसे लागत असतील ना? तो जमाना गेला आता ७ हजारांत स्मार्ट टीव्ही येत आहे. देशात आज एका कंपनीने हा स्मार्टटीव्ही लाँच केला आहे.
भारतात सीडी प्लेअरद्वारे एन्ट्री करणारी जर्मन कंपनी Blaupunkt ने हा स्वस्तातला टीव्ही आणला आहे. २४ इंचाच्या या टीव्हीमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. हा टीव्ही ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे हा बहुपयोगी आहे. म्हणजे हा टीव्ही कॉम्प्युटरचा मॉनिटर म्हणून देखील वापरता येणार आहे. कंपनीने सांगितले की हे 3-इन-1 उपकरण आहे ज्याचा वापर मॉनिटर, स्मार्ट फीचर्सचा अनुभव आणि टेलिव्हिजन म्हणून केला जाऊ शकतो.
Blaupunkt चा हा स्मार्ट टीव्ही 7,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मात्र, कंपनी सध्या यावरही सूट देत आहे. हा स्मार्ट टीव्ही Rs.6,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत या किंमतीत विक्री केली जाईल. या 24 इंचाच्या टीव्हीमध्ये HD रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 20-वॅटचा साऊंड आऊटपूट देण्यात आला आहे. फायरिंग स्पीकरसोबत सराउंड साउंड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
यामध्ये पीसी, मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा सपोर्ट देण्यात आला आहे. Youtube, Prime Video, Zee5, Voot आणि Sony LIV साठी समर्पित शॉर्टकट की देखील त्याच्या रिमोटमध्ये देण्यात आल्या आहेत. Blaupunkt TV मध्ये 512MB RAM आहे. याशिवाय यात 4GB ROM देण्यात आली आहे. डिस्प्लेसाठी डिजिटल नॉईज फिल्टर आणि A+ पॅनेल देण्यात आले आहे.