मच्छरचा त्रास हा उन्हाळ्यात खूप वाढतो. यावर उपाय म्हणून मच्छरची अगरबत्ती, केमिकल स्प्रे आणि इतर अनेक उपाय केले जातात. परंतु या उपायांचा फक्त मच्छरवर नव्हे तर आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. तसेच हे उपाय मच्छरला मारत नाहीत तर दूर पळवतात. उपाय थांबवले की पुन्हा मच्छरांची टोळी हल्ला करते. आज तुम्हाला एका किफायतशीर मशीनची माहिती देणार आहोत, जी कोणत्याही केमिकलविना मच्छरांना मारते.
तसे बाजारात मच्छर मारण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. यात केमिकल आणि धूर असे मानवी आरोग्यासाठी घातक उपायांचा देखील समावेश आहे. तर काही मशिन्स करंट देऊन मच्छर मारतात. तुम्ही टेनिस रॅकेट सारखं डिवाइस देखील पाहिलं असेल. परंतु आम्ही अश्या मशीनची माहिती देणार आहोत जी एका ठिकाणी राहून मच्छर मारते.
Mosquito Killer Machine
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर Mosquito Killer Machine उपलब्ध आहेत. या मशिन्समध्ये एक लाईट पेटत असते, या प्रकासहकडे मच्छर आकर्षित होतात. त्यानंतर या मशीनमध्ये त्यांचा खात्मा होतो. विशेष म्हणजे ही मशीन चारही बाजूंनी मच्छर आकर्षित करते. या मशिन्सची किंमत 700 रुपयांपासून सुरु होते.
ही Mosquito Killer Machine तुम्ही टेबलवर ठेऊ शकता किंवा भिंतीला टांगू शकता. ही मशीन USB पोर्टमध्ये प्लग इन करून वापरू शकता. त्यामुळे तुम्ही घराबाहेर लॅपटॉप घेऊन लॅपटॉपवर ही मशीन चालू करू शकता. तसेच पावर बँकमध्ये प्लग करून या मशीनला तुमच्या पिकनिक किंवा कॅम्पिंग स्पॉटवर देखील वापरू शकता. या मशीनसोबत तुम्हाला 1 Mosquito Killing Lamp मिळतो, तसेच 1 USB Charging Cable आणि 1 क्लीनिंगसाठी ब्रश देखील दिला जातो. ही मशीन सहज साफ करता येते.