itel कंपनीने भारतीय बाजारात स्वस्तात मस्त असा ड्युअल कॅमेरा आणि ऑक्टाकोअर प्रोसेसर असणारा फोन लाँच केला आहे.
5.45-इंच HD+ फुल-स्क्रीन डिस्प्लेसह पाठीमागे ड्युअल टोन डिझाईन देण्यात आली आहे. Android 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे परवडणाऱ्या किंमतीत AI ड्युअल रियर कॅमेरा आणि ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन रेडमीच्या Redmi 6A ला टक्कर देणार आहे.
itel A46 मध्ये 2GB रॅमच्या व्हेरिअंटची किंमत 4,999 ठेवण्यात आली आहे. हा फोन डायमंड ग्रे, रेड, निऑन वॉटर आणि डार्क वॉटर रंगात उपलब्ध होणार आहे. हा फोन दुकानांमध्ये खरेदी करता येणार आहे. या कंपनीने जिओसोबतही करार केला आहे. यातून 50GB डेटा कॉम्प्लीमेन्टरी 24 महिन्यांसाठी मिळणार आहे. यासोबत 100 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी देखिल मिळणार आहे.
itel A46 मध्ये 5.45 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 1.6GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅमसोबत 16 जीबीचे स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. स्टोरेज स्पेस 128GB पर्यंत वाढविता येणार आहे. बॅटरी 2400 एमएएच देण्यात आली आहे.