शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

हा कसला बहिष्कार?... चिनी कंपनीचा मोबाईल अवघ्या काही मिनिटांत 'आऊट ऑफ स्टॉक'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 6:06 PM

चीनच्या विरोधात भारतात असं वातावरण असतानाही चिनी कंपनी असलेल्या वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्दे चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबवली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही असं आवाहन केलं जात आहे.चीनच्या विरोधात भारतात असं वातावरण असतानाही चिनी कंपनी असलेल्या वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या स्मार्टफोनसाठी काल भारतात सेल ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांच्या आतच हा स्मार्टफोन ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाला आहे.

नवी दिल्लीः भारत-चीन दोन्ही देशांमध्ये सध्या मोठा तणाव सुरू आहे. लडाखच्या सीमेवरील चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आलं, तर चीनच्या 43 सैनिकांचाही भारतानं खात्मा केला. त्याच पार्श्वभूमीवर चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबवली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही असं आवाहन केलं जात आहे. चीनच्या विरोधात भारतात असं वातावरण असतानाही चिनी कंपनी असलेल्या वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या स्मार्टफोनसाठी काल भारतात सेल ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांच्या आतच हा स्मार्टफोन ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाला आहे. सेलमध्ये OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही होत्या. एसबीआयच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 3,000 रुपये इन्स्टंट डिस्काऊंट मिळत होते. याशिवाय जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतच्या जिओ बेनिफिट्सची ऑफर होती. काल १८ तारखेला वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी अ‍ॅमेझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर हा सेल आयोजित करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्य देण्यात आली होती. OnePlus 8 Pro स्मार्टफोनमध्ये HDR10+ सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.78 इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह या फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, दुसरा 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. अँड्रॉइड 10 आधारित OxygenOS वर कार्यरत असणाऱ्या या फोनमध्ये 4510mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रामरीन ब्लू, ऑनिक्स ब्लॅक आणि ग्लेशियल ग्रीन अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. तर, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे. विशेष म्हणजे देशभरात चीनविरोधात वातावरण असताना या स्मार्टफोनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानं सगळेच अचंबित झाले आहेत. तत्पूर्वी वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी 29 मे रोजी सेल आयोजित करण्याचं ठरलं होतं. पण कोरोना व्हायरसमुळे उत्पादन प्लांट बंद झाल्यानंतर तो सेल पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर हा 15 जून रोजी पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध झाला. त्यावेळीही फोन काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला होता.

हेही वाचा

सत्तेत आल्यापासून आम्ही १०० टक्के समाजकारणच केले- आदित्य ठाकरे

चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे होणार वितरण, प्रथम विजेत्यास ५ लाख मिळणार

राहुल गांधींचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा गरजूंना मदतीचा हात

Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल