मोबाइल फोनपासून ते जगातल्या वेगवेगळ्या संस्था व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी Face Recognition ला प्राधान्य देतात. पण चीन यात एक पाऊल पुढे आहे. चीनची थेअरी ही आहे की, व्यक्तीची ओळख त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून होते. चीनने एक असं तंत्रज्ञान तयार केलं आहे, ज्याद्वारे व्यक्तीची ओळख ही त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून केली जाईल. म्हणचे चेहरा झाकलेला असेल तरी सुद्धा त्याची ओळख पटवली जाईल.
हे कसं केलं जातं?
या तंत्रज्ञानाला Gait Recoginiton नाव देण्यात आलं आहे. हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करणारी कंपनी वॅटिक्स अॅनालिसिसने तयार केलं आहे. यात एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या अंदाजाला हजारो मॅट्रिक्समध्ये तोडून त्यांचं विश्लेषण करून ओळखलं जातं. कंपनीचं म्हणणं आहे की, चालण्यादरम्यान प्रत्येक व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत एक वेगळ्या प्रकारची हालचाल होत असते. Gait Recoginiton याचा आधारावर डेटाबेस तयार करतं.
९६ टक्के ओळख यशस्वी
वॅट्रिक्सने माहिती दिली की, अजूनही या तंत्रज्ञानावर चाचण्या सुरू आहेत. चाचण्यांदरम्यान या तंत्रज्ञानाने ९६ टक्के योग्य ओळख पटवणे शक्य झालं आहे. फेस रिकगनिशनही वापरात येण्याचा फार जास्त काळ झाला नाही. पण यात एक समस्या आहे. ती म्हणजे जोपर्यंत व्यक्तीचा पूर्ण चेहरा पाहिला जात नाही तोपर्यंत त्याची योग्य ओळख पटवली जाऊ शकत नाही. इथकेच नाही तर लोक चेहऱ्यावर काही लावून किंवा काही बदल करून सहजपणे Facial Recognition तंत्रज्ञानाला फसवू शकतात.
पाय झाकले तरी पटवली जाणार ओळख
वॅट्रिक्सचे को-फाऊंडर Huang Yongzhen सांगतात की, 'चालताना कुणी पाय झाकले तर ओळख पटवणे कठीण होईल का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण असं नाहीये. आमचं तंत्रज्ञाना संपूर्ण शरीरात चालण्या दरम्यान होणाऱ्या बदलांवर फोकस करतं'.
शांघाय आणि बीजिंगमध्ये वापर
कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या तंत्रज्ञानाचं पहिलं व्हर्जन लॉन्च केलं आहे. सिंगापूर, रशिया आणि नेदरलॅंडसारख्या देशांसोबत डील सुद्धा होऊ लागली आहे. शांघाय आणि बीजिंगमध्ये अथॉरिटीज या तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांना पकडण्यासाठी करत आहेत.