Lava Blaze 5G: एकीकडे मोबाईल युजरना ५जी लाँच होऊनही ५जी चा सिग्नल मिळत नाहीय. कंपन्यांनी ५जी शिक्का असलेले फोन विकले खरे परंतू त्यात ५जी इनेबल केलेच नाही. अनेक फोनमध्ये केवळ दोनच बँड देण्यात आले आहेत. अशाप्रकारे चिनी कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांतं माया गोळा केलेली असताना भारतीय कंपनीने देशातील स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच केला आहे.
5G Signal: सेटिंग बदलली तरी 5G सिग्नल येईना? स्मार्टफोन कंपन्यांनी 'गेम' खेळला, काय ते पहा...
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा फोन इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच केला आहे. Lava Blaze 5G असे या फोनचे नाव आहे. या फोनचा किंमत १०००० रुपयांपेक्षा कमी आहे. जिओदेखील स्वस्त ५जी फोन भारतात लाँच करणार आहे. जिओचा हा फोन ८ ते १० हजारांच्या आत असेल. असे असताना लावा कंपनीने आणखी एक खळबळ उडवून दिली आहे.
Lava Blaze 5G मध्ये आठ बँडस् असणार आहेत. 1/3/5/8/28/41/77/78 असे बँड्स मिळणार आहेत. या फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. याद्वारे 2.2 GHz चा स्पीड मिळतो. यात 50 MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात ४जीबी रॅम देण्यात आली असून ३ जीबीची व्हर्च्युअल रॅमदेखील वापरता येणार आहे.
देशात एअरटेलकडून ५जी नेटवर्क रोलआऊट करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात ५जी स्मार्टफनची विक्री होत आहे. अनेकांनी ५जी नेटवर्क वापरता येईल म्हणून पुढचा विचार करून ५जीचे हे फोन घेतले आहेत. परंतू गेल्या वर्षभरात घेतलेल्या स्मार्टफोनमध्येच ५जी चा सिग्नल दिसत आहे. मग गेल्या वर्षात घेतलेल्या फोनमध्ये का नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.