नवी दिल्ली : 2022च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत जगभरात 7%, तर भारतात 1 टक्क्याने घट झाली आहे. या तिमाहीत जगभरात 32.8 कोटी, तर भारतात 3.80 कोटी स्मार्टफोन विकले गेले. फीचर फोनची विक्री या दरम्यान 39%नी कमी झाली असून, भारतात विक्रीत 16%नी घट झाली आहे.
येथे सर्वात जास्त वापरकर्ते
चीन, भारत, इंडोनेशिया, अमेरिका, ब्राझील, रशिया, पाकिस्तान, नायजेरिया, बांगलादेश
चिनी कंपन्यांचे वर्चस्व झाले कमी
भारतीय बाजारामध्ये चिनी स्मार्टफोन कंपन्यांचे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यांचा विक्रीत एकूण वाटा 74 टक्के राहिला आहे. देशात 5जी स्मार्टफोनच्या विक्रीत वनप्लस अव्वल स्थानावर राहिला आहे.
स्मार्टफोन्सची विक्री घटण्याची कारणे
- सुट्या भागांचा तुटवडा
- कोरोनाचा पुन्हा सुरु झालेला प्रसार
- रशिया-युक्रेन युद्ध
मार्केट शेयरचं गणित
भारतात स्मार्टफोन्सच्या मार्केट शेयरमध्ये शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे परंतु कंपनीचा मार्केट शेयर 13 टक्क्यांनी कमी झाला आहे. 1 टक्के घट झाल्यामुळे 20 टक्के हिस्स्यासह सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रियलमीनं जुन्या दिग्गजांना धक्का देत 40टक्के वाढ करत तिसऱ्या क्रमांक 16 टक्के मार्केट शेयरनी मिळवला आहे. विवो चौथ्या तर ओप्पो पाचव्या स्थानावर आहे, यांचा मार्केट शेयर अनुक्रमे 15 आणि 9 टक्के आहे. देशातील 17 टक्के स्मार्टफोन अन्य कंपन्यांच्ये आहेत.