(Image Credit : serbanbiometrics.es)
टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस इतका विकास करत आहे की, कधी-कधी काही गोष्टींवर विश्वास ठेवणंही अवघड जातं. आता हेच बघा ना, एका टेक्नॉलॉजीनुसार, केवळ हातांच्या नसांवरून व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे. चीनच्या मीलक्स या कंपनीने ही टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. ही टेक्नॉलॉजी फेस रिकग्निशनपेक्षाही वेगवान आहे. नव्या टेक्नीकमुळे ०.३ सेकंदात नसांच्या माध्यमातून व्यक्तीची ओळख पटवली जाणार. कंपनीने या टेक्नीकला एअरवेव असं नाव दिलं आहे. कंपनीचा दावा आहे की, ही टेक्नीक दुसऱ्या बायोमेट्रिक टेक्नीकपेक्षा अधिक चांगली आणि सुरक्षित आहे.
कॅफेटेरिया आणि सार्वजनिक क्षेत्रात वापर सुरू
कंपनीनुसार, जेव्हा फेस रिकग्नीशन टेक्नीकने व्यक्तीची ओळख पटवली जाते, तेव्हा चेहऱ्यावरील ८० ते २८० फीचर पॉइंट्सची टेस्ट होते. पण एअरवेव ०.३ सेकंदात तळहातावर असलेल्या एक मिलियनपेक्षा अधिक मायक्रो-फीचर पॉइंट्स स्कॅन करतं. याने व्यक्ती कुणाचीही फसवणूक करू शकणार नाही.
कंपनीचे फाउंडर जेल क्यूंगलू यांनी सांगितले की, त्वचेच ठीक खालील प्रमुख नसा आणि पेशी व्यक्तिगत रूपाने प्रत्येकात वेगवेगळ्या असतात. एअरवेव आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सवर आधारित आहे. जे तळहाताच्या माध्यमातून सूक्ष्म आणि प्रमुख धमण्यांपासून ते पेशींना स्कॅन करण्यास सक्षम आहे. स्कॅनरवर हात ठेवताच एकाच वेळी यांना स्कॅन केलं जातं.
चीन सध्या जास्तीत जास्त कामे कॅशलेस आणि फेस रिकग्निशन टेक्नीकच्या माध्यमातून केली जात आहेत. जास्तीत जास्त फेस रिकग्निशन, क्यूआर कोड आणि पासवर्डचा वापर केला जात आहे. मीलक्स कंपनीने दावा केला आहे की, याबाबत सायबर सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित होत आहे. पण एअरवेव इतरांपेक्षा अधिक चांगली आणि सुरक्षित टेक्नीक आहे.
कंपनीचे फाउंडर जेल क्यूंगलू यांच्यानुसार, एअरवेवला २०१८ मध्ये सादर केलं गेलं होतं. गेल्या एका वर्षात चीनमध्ये ट्रायल चालू होतं आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला. दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतात काही कॅफेटेरिया आणि सरकारी-सार्वजनिक क्षेत्रांमध्ये याचा वापर वाढला आहे.