DeepSeek Lab R1 AI : जगात आघाडीवर राहण्यासाठी चीन आणि अमेरिकेत अनेकदा तगडी स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रात एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोन्ही देश आतुरलेले असतात. दरम्यान, आता चीननेतंत्रज्ञान विश्वात खळबळ माजवली आहे. यामुळे सिलिकॉन व्हॅली पूर्णपणे हादरली असून, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या तंत्रज्ञान कंपन्या तणावात आल्या आहेत. चायनीज कंपनी DeepSeek Lab ने R1 AI मॉडेल लॉन्च केले आहे, जे सध्या जगभरात खूप लोकप्रिय होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ते ChatGPT, Google Gemini सारख्या AI ला मागे टाकत आहे.
OpenAI ने 2022 मध्ये ChatGPT लॉन्च केले, तेव्हा या जनरेटिव्ह AI ची जगभरात चर्चा होऊ लागली. मायक्रोसॉफ्टच्या या एआय टूलमुळे गुगल, अॅपल आणि मेटासारख्या बड्या कंपन्यांचे टेन्शन वाढले होते. ChatGPT आल्यानंतर या कंपन्यांनी त्यांचे जनरेटिव्ह एआय मॉडेल लॉन्च केले, ज्यांचे दोन वर्षांत लाखो युजर्स झाले. आता चीनी कंपनीच्या नव्या एआय मॉडेलने सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना चिंतेत टाकले आहे.
सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी चीनी स्टार्टअप कंपनी DeepSeek च्या नवीन एआय मॉडेलवर भाष्य केले आहे. सत्या नडेला म्हणाले की, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तर, पर्पलेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास म्हणाले की, ओ1 मिनीची प्रतिकृती बनवून, डीपसीकने प्रभावीपणे ओपन सोर्स बनवले आहे. दरम्यान, हे AI मॉडेल चर्चेत आहे कारण म्हणजे, त्याचे तंत्रज्ञान स्वस्त आहे.
डीपसीक एआय म्हणजे काय?हे एआय टूल प्रगत भाषेवर काम करते, ज्यामध्ये हायब्रीड आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. पण, R1 हे कंपनीचे पहिले AI मॉडेल नाही. कंपनीच्या AI मॉडेलची ही तिसरी आवृत्ती म्हणजेच V3 आहे. DeepSeek चे मुख्यालय चीनच्या Hangzhou शहरात असून, ही कंपनी 2023 मध्ये लिआंग वेनफेंग यांनी स्टार्टअप म्हणून सुरू केली होती. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच AGI विकसित करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
कमी खर्चात तयारDeepSeek R1 च्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे त्याची परवडणारी किंमत. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, हे AI मॉडेल अमेरिकन AI मॉडेलपेक्षा खूपच स्वस्त आहे. ओपन AI o1 ची किंमत $15 प्रति मिलियन इनपुट टोकन आणि $60 प्रति मिलियन आउटपुट टोकन आहे. तर, या चीनी AI मॉडेलची किंमत $0.55 प्रति मिलियन इनपुट आणि $2.19 प्रति मिलियन आउटपुट टोकन आहे. हे एआय मॉडेल तयार करण्यासाठी केवळ दोन महिने लागल्याचा दावा चिनी कंपनीने केला आहे. ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट, मेटा सारख्या कंपन्यांनी त्यांचे एआय मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागली आणि या दिग्गज कंपन्यांनी त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. पण, डीपसीक अतिशय कमी खर्चात तयार झाले आहे.