मुंबई - देशातील आघाडीचे शॉर्ट व्हिडिओ अॅप चिंगारीने (Chingari) रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० आणि बीईंग ह्यूमन- द सलमान खान फाउंडेशनसह चिंगारी अॅपच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत ‘ब्रीद’ हा प्रकल्प आहे. याअंतर्गत दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातील कमी आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
प्रोजेक्ट ‘ब्रीद’ अंतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करेल. हे या भागातील विविध रुग्णालयांमध्ये दिले जातील. या कॉन्सन्ट्रेटर्सचा वापर रुग्णालयात होम आयसोलेशन अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेच्या स्वरुपात केला जाईल. यामुळे सध्या मोठया तणावाचा सामना करणाऱ्या रुग्णालयांवरील थोडे ओझे कमी होईल.
चिंगारी अॅपचे सीईओ आणि सह संस्थापक सुमित घोष म्हणाले, “रोटरी इंटरनॅशनल आणि बीइंग ह्यूमन नेहमीच गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतो आणि ते देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीवर विश्वास ठेवणारे हे एक संघटन आहे. आपल्या लोकांसाठी उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यामुळेच आम्ही इतर कोणताही विचार न करता ‘ब्रीद’ ला पुढे नेण्यासाठी पाठींबा दिला आहे. महामारीतून सावरण्यासाठी देश आणि टीम चिंगारी एकत्र लढतील.”
प्रसिद्ध लेप्रोस्कोपिक सर्जन आणि रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ. भरत पंड्या म्हणाले, “रोटरी इंटरनॅशनल एक शतकापेक्षाही जास्त काळापासून जगभरात मानवतावादी उपक्रम राबवण्यात सर्वात अग्रभागी आहे. कोविड काळातही रोटरीने कोविड बचावाचे उपाय आणि उपाचारांच्या पायाभूत आराखड्याला पाठींबा देण्यासाठी जगभरात सुमारे ३५ दशलक्ष डॉलर आणि फक्त भारतात ५ दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. या पवित्र कामाला पाठींबा देण्यासाठी रोटरीसह भागीदारी करण्यासाठी चिंगारी आणि बीईंग ह्यूमनचे आम्ही आभारी आहोत. भविष्यातही त्यांच्यासोबत भागीदारी करण्याची आम्ही आशा करतो.”