नवी दिल्ली : नव्या आयफोनच्या लाँचिंगसाठी आता 1 महिन्यापेक्षा कमी वेळ उरला आहे. यामुळे आयफोनच्या नव्या श्रेणींबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार कंपनी आयफोन प्रो नावाने डिव्हाईस लाँच करणार आहे. आयफोनसॉफ्टनुसार आयफोन एक्सएस मॅक्सचा पुढील फोन आणि सर्वात महागडा असणार आहे. या फोनचे नाव आयफोन 11 प्रो मॅक्स असू शकते.
आयफोन एक्सआरच्या पुढील फोनचे नाव आयफोन 11 असू शकते. सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या आयफोनचे नाव आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स असेल.
बऱ्याचशा बदलामध्ये अॅपल खूप उशिराने उतरते. ड्युअल सिम, ड्युअल-ट्रिपल कॅमेरा, मोठी स्क्रीन असे अनेक बदल कंपनीने सॅमसंग, वनप्लसने केल्यानंतर एक, दोन वर्षांनी केले आहेत. ड्युअल सिम तर बऱ्याच वर्षांनी केले आहे. यंदा अॅपल नव्या आयफोनमध्ये मोठी बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा देण्याची शक्यता आहे. दोन नव्या आणि महागड्या मॉडेल्समध्ये पुढे 10 मेगा पिक्सल आणि रिअरला 14 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. अॅपल विक्री वाढविण्यासाठी नव्या मॉडेलच्या किंमतींमध्ये जास्त वाढ करणार नाही.
किंमतींचा अंदाज
- iPhone XS च्या पहिल्या फोनची किंमत 999 डॉलर म्हणजेच 69 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते.
- iPhone XS Max ची किंमत 76 हजार रुपये, iPhone XR ची किंमत 51 हजार रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.