नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध स्मार्टफोन्स बाजारात लॉंच केले जात आहेत. कमी किंमतीत अधिक सुविधा असणारे स्मार्टफोन्स सादर करण्यात कंपनीची स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच लाखो युझर्सच्या पसंतीस पडलेल्या रेडमी नोट सिरीजमधील Redmi Note 10S हा स्मार्टफोन भारतात लॉंच होणार असून, त्याची अधिकृत घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. (company revealed launch date of redmi note 10s smartphone)
गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन्स युझर्समध्ये Redmi Note 10S लॉंचिंग डेटबाबत उत्सुकता होती. अखेर १३ मे २०२१ रोजी दुपारी १२ वाजता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाणार आहे. रेडमी इंडियाने याबाबतची घोषणा ट्विटरवरून केली आहे. युट्युबवर या सोहळा पाहता येणार आहे. शाओमीनेही यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.
Redmi Note 10S ची वैशिष्ट्ये
अलीकडेच शाओमीने Redmi Note 10S च्या रिटेल बॉक्सची इमेज प्रसिद्ध केली होती. या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला असून, ब्ल्यू, डार्क ग्रे आणि व्हाइट या तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. गेल्या महिन्यात जागतिक बाजारपेठेत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. भारतात Redmi Note 10S हा स्मार्टफोन ६जीबी + ६४जीबी, ६जीबी + १२८जीबी आणि ८जीबी + १२८जीबी या तीन व्हेरिअंटमध्ये लॉंच केला जाणार आहे.
तुमच्या नावाचं Sim Card भलतच कोणीतरी वापरतंय का? 'अशी' करून घ्या खात्री
Redmi Note 10S मध्ये अँड्रॉइड ११ चा सपोर्ट दिला जाणार असून, ६.४३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणार आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक प्रोसेसरवर आधारित आहे. तसेच यामध्ये ५०००mAh बॅटरी देण्यात आली असून, ३३W फास्ट चार्चिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला असून, १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.