चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी नवीन फिचर आपल्या स्मार्टफोन्समध्ये सादर करण्यास सुरुवात केली आहे. या फिचरचे नाव आहे वर्चुअल रॅम किंवा एक्सटेंडेड रॅम किंवा डायनॅमिक रॅम, ज्यात स्मार्टफोनमधील इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम प्रमाणे करता येतो. रियलमीने देखील आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम फिचर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्समध्ये 1, 2, 3 ते अगदी 6GB अतिरिक्त रॅम वाढवता येतो.
रियलमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर मिळत आहे. तर काही स्मार्टफोन्सना हे फिचर सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. रियलमी 8 सह काही स्मार्टफोन्समध्ये हे फिचर आधीपासून उपलब्ध आहे. एका भारतीय ब्लॉगरने रियलमीच्या त्या डिव्हायसेसची यादी मिळवली आहे ज्यात डायनॅमिक रॅम फिचर मिळणार आहे. यात सर्व लेटेस्ट स्मार्टफोन्सचा समावेश आहे आणि याची सुरवात Realme 6 होते. पुढे आम्ही रियलमीच्या सर्व स्मार्टफोन्सची यादी दिली आहे. ज्यात डायनॅमिक रॅम फिचर उपलब्ध आहे किंवा भविष्यात उपलब्ध होईल. यात भारतात तसेच जागतिक बाजारात उपलब्ध असलेल्या रियलमी स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे.
- Realme X50 Pro
- Realme X50
- Realme-X50m
- Realme X7 Pro
- Realme X7 Max
- Realme-X7
- Realme X2 Pro
- Realme X2
- Realme-XT
- Realme X3
- Realme X3 SuperZoom
- Realme-8 Pro
- Realme 8 4G
- Realme 8 5G
- Realme-7 Pro
- Realme 7
- Realme 7i
- Realme-6 Pro
- Realme 6
- Realme 6i
- Realme-Narzo 30 Pro
- Realme Narzo 20 Pro
- Realme Narzo 30
- Realme-Q3 Pro
- Realme Q3
- Realme Q2 Pro
- Realme-Q2
- Realme V3
- Realme V5
- Realme-V15
- Realme GT
- Realme GT Neo
- Realme-GT Flash Edition