सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणं आणि त्यातून पैसे कमावण्याचा छंद अनेकांना जडला आहे. लोकं व्हायरल व्हिडिओच्या चक्करमध्ये अनेकदा दुसऱ्यांचा कन्टेंट अथवा म्युझिक त्यांच्या व्हिडिओला लावून युट्यूबवर पोस्ट करतात. या कृतीने अशा लोकांच्या व्हिडिओवर युट्यूबकडून कॉपी राईट स्ट्राईक लागतो. ज्यामुळे जरी हा व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्यातून काही फायदा मिळत नाही. तुमच्यासोबत असं व्हायला नको, त्यासाठी आम्ही तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक हटवणे आणि त्यातून वाचण्याचा मार्ग सांगणार आहोत.
कॉपी राइट का लागतो?
एखाद्या व्हिडिओवर कॉपी राईट तेव्हा लागतो जेव्हा तुम्ही दुसऱ्या युजरचा व्हिडिओ बनवून तुमच्या अकाऊंटला अपलोड करता. जर तुम्ही अन्य कुणाचं गाणं तुमच्या व्हिडिओला लावलं तर त्यावर कॉपी राइट येतो. जर एखादे बुक, स्टोरी, नोवेल ज्यावर ट्रेडमार्क आहे. त्याचा वापर तुम्ही व्हिडिओत करू शकत नाही. एखाद्या पेड सॉफ्टवेअरला फ्रीमध्ये डाऊनलोड करणे शिकवत असाल तर अशावेळीही कॉपी राइट येतो. जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करत असाल आणि अशी दृश्ये जी कॉपीराइटचं उल्लंघन करणारी असतील तर तेव्हाही युट्यूब एक्शन घेते.
कॉपीराइट स्ट्राइक हटवण्याचा केवळ एक पर्याय आहे, ज्यात तुम्हाला एकतर व्हिडिओ डिलीट करावा लागेल किंवा युट्यूबला तुमच्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल. तुम्ही वापरेलेले फुटेज अथवा इतर बाबी फ्री कॉपीराईट आहेत हे त्यांना स्पष्ट करावे लागेल.जर तुम्ही तुमच्या युट्यूब स्ट्राइककडे दुर्लक्ष करत असाल तर युट्यूब तुमच्या चॅनेलवर बंदी आणू शकते. कॉपीराइट ओनरशी संपर्क साधा. व्हिडिओ डीलिट करण्याआधी तुमचा व्हिडिओ कॉपीराइट फ्री आहे का याची पडताळणी करा.
त्यानंतर स्ट्राइक एक्सेप्ट करून कॉपीराइट स्कूल अटेंड करा. याठिकाणी तुम्ही कॉपीराइट ओनरशी ज्याने क्लेम केला आहे त्याच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी जर तुमचं चॅनेल असेल तर तुम्ही युट्यूब पार्टनर प्रोग्रामध्ये सहभागी होऊ शकता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिला जातो. लक्षात ठेवा, चॅनेलला युट्यूबकडून कॉपीराइट उल्लंघनाचे ३ स्ट्राइक मिळाले तर तुम्हाला ७ दिवसांत व्हिडिओ हटवावे लागतात किंवा त्या पार्टला रिमूव्ह करावे लागते. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे चॅनेल बंद केले जाते.