नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. कोरोनामुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक कोरोना कसा होतो?, त्याची लक्षण नेमकी काय आहेत? तसेच त्यापासून कसा बचाव करायचा? याबाबतची सर्व माहिती इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत. एकीकडे घराबाहेर पडू नका आणि स्वतःची व कुटूंबाची काळजी घ्या अस आवाहन करण्यात येत असताना दुसरीकडे काही बनावट आणि धोकादायक वेबसाईट कोरोनाच्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट लिंक लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम डिव्हिजनने कोरोना व्हायरसच्या नावाने तयार करणाऱ्या बनावट वेबसाईटपासून लांब राहण्याचा लोकांना सल्ला दिला आहे. पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बनावट आणि धोकादायक असलेल्या वेबसाईटची एक लिस्ट जारी केली आहे. तसेच या लिंक ओपन करू नका असं आवाहनही सर्वसामान्यांना केलं आहे. याआधी सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्डर फ्युचरने यासारखीच एक लिस्ट जारी केली होती. कोरोना व्हायरसच्या नावाने तयार करण्यात आलेल्या वेबसाईट अत्यंत धोकादायक आहेत.
‘या’ आहेत धोकादायक वेबसाईट
coronavirusstatus[.]space
coronavirus-map[.]com
blogcoronacl.canalcero[.]digital coronavirus[.]zone
coronavirus-realtime[.]com
coronavirus[.]app
bgvfr.coronavirusaware[.]xyz
coronavirusaware[.]xyz
corona-virus[.]healthcare
survivecoronavirus[.]org
vaccine-coronavirus[.]com
coronavirus[.]cc
bestcoronavirusprotect[.]tk
coronavirusupdate[.]tk
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ
Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू
CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!
'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय