नवी दिल्ली - जगभरात कोराना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा अनेक कंपन्यांना फटका बसला असून मोठं नुकसान झालं आहे. जगातील सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. फेसबुक आणि गुगल या दोन कंपन्याचं देखील कोरोनामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेसबुक आणि गुगलचं कोरोना व्हायरसमुळे 2020 मध्ये 44 बिलियन डॉलर म्हणजेच 4400 कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकतं. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
2020 मध्ये गुगल आणि फेसबुक या दोन्ही कंपन्यांना कोरोना व्हायरसमुळे जाहिराती कमी आल्या आहेत. त्यामुळे 4400 कोटी डॉलरचं नुकसान होऊ शकतं. ग्लोबल इन्व्हेंस्टमेंट बँक आणि आर्थिक सेवा कंपनी कॉवेन अँड कंपनीच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये गुगलला 127.5 बिलियन डॉलरचा नफा होणार असल्याचा अंदाज होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे यात 28.6 बिलियन डॉलरची कमी येण्याची शक्यता आहे. कॉवेनच्या रिपोर्टनुसार, या वर्षी ट्विटरच्या कमाईत 18 टक्के कमी पाहायला मिळू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे. अॅपलचं या व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे. TF इंटरनेशनल सिक्यॉरिटी अॅनालिस्ट मिंग-ची कुओने 2020 च्या पहिल्या तिमाहीत अॅपलच्या शिपमेंटमध्ये 10 टक्क्यांनी घट झाल्याचं सांगितलं आहे. कुओने पहिल्या तिमाहीत ग्लोबल आयफोन शिपमेंट 36 ते 40 मिलियन असून ती आधीच्या तुलनेत 10 टक्के कमी झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने कंपनीने चीनमधील आपले कॉर्पोरेट ऑफिस, स्टोर आणि रिपेरिंग सेंटर बंद केले आहेत. तसेच अँड्रॉईड उत्पादनाचे कारखाने बंद करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत
Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर
Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?
CoronaVirus : ...फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला