नवी दिल्ली : देशात तीन आठवड्यांचे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर अनेक लोक घरी बसून काम करीत आहेत. त्यांना मदतव्हावी यासाठी दूरसंचार कंपन्यांनी अतिरिक्त डाटा पुरविण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच कंपन्यांनी ‘अॅड-आॅन पॅक’ जाहीर केले आहेत.सर्व लोक आता या ना त्या कारणाने सेल्युलर डाटावर अवलंबून आहेत, असे ट्रायने स्पष्ट केलेले आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी वाढीव डाटा सुविधा उपलब्ध करून दिली आहे.एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विविध किमतीचे अॅड-आॅन पॅकही कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. एअरटेलचा सर्वांत कमी किमतीचा प्लॅन ४८ रुपयांचा असून, त्यात २८ दिवसांसाठी ३ जीबी डाटा मिळणार आहे.९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी ६जीबी डाटा मिळेल. २९६ रुपयांच्या प्लॅनमध्ये २जीबीडाटा दररोज मिळेल. याचप्लॅनमध्ये नाइट पॅकची (रात्री १२ ते सकाळी ६) सोय असून, त्यात रात्री १जीबी+१जीबी डाटा मिळेल.५४६ रुपयांच्या प्लॅनमध्ये २जीबी+ २जीबी नाइट पॅक मिळेल. ७९६ रुपयांत ३जीबी+३जीबी डाटा मिळेल. अशाच प्रकारे २०जीबी+ २० जीबीपर्यंतचे प्लॅन एअरटेलने जाहीर केले आहेत.व्होडाफोनचा पहिला प्लॅन १६ रुपयांचा असून, त्यात एक दिवसासाठी १जीबी डाटा मिळणार आहे. ४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३जीबी डाटा २८ दिवसांसाठी मिळेल. ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६जीबी डाटा २८ दिवसांसाठी मिळेल.- रिलायन्स जिओने नुकताच २५१ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे. त्यात ५१ दिवसांसाठी दररोज २जीबी डाटा मिळणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि संदेशांची सुविधा मात्र नाही. याशिवाय कंपनीने आपले टॉप-अप व्हाउचर्स सुधारून घेतले आहेत. त्यात कंपनीने आहे त्या प्लॅनमध्ये दुप्पट डाटा आणि कॉलिंगची सोय केली आहे.
CoronaVirus : लॉकडाउन काळात दूरसंचार कंपन्या देणार अतिरिक्त डाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:28 AM