रेल्वे प्रवास करताना आरक्षित तिकीट मिळवणं आवश्यक असतं. रिजर्वेशनसाठी दोन पर्याय असतात, तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तिकीट बुक करू शकता किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनवर जाऊन काउंटरवरून अॅडव्हान्स तिकीट बुक करू शकता. परंतु जेव्हा तिकीट कॅन्सल करण्याची वेळ येते तेव्हा ऑनलाईन बुकिंग काही क्लिक्समध्ये रद्द करता येते परंतु काउंटरवरून काढलेल्या तिकिटासाठी पुन्हा धावपळ करावी लागते.
परंतु तुम्हाला माहित आहे का काउंटरवरून घेतलेलं तिकीट देखील ऑनलाइन कॅन्सल करता येतं. त्यामुळे काउंटरवर रांगेत थांबण्याची गरज नाही यात तुमचा वेळ देखील खूप वाचतो. परंतु हे फिचर वापरण्यासाठी काउंटरवरून बुकिंग करताना तुम्ही योग्य मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे. तसेच IRCTC च्या वेबसाईटवरून तिकीट कॅन्सल करता येईल परंतु रिफंडसाठी तुम्हाला स्टेशनवर ओरिजिनल तिकीट घेऊन जावं लागेल. कन्फर्म तिकीट ट्रेन सुरु होण्याआधी 4 तास, तर RAC किंवा वेटिंग लिस्टमधील तिकीट 30 मिनिट्स आधी रद्द करता येतं.
अशी आहे प्रोसेस
- सर्वप्रथम https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf वर जा.
- इथे कॅन्सलेशनचा ऑप्शन निवडा आणि PNR Number, ट्रेन नंबर आणि कॅप्चा टाकून घ्या.
- त्यानंतर टर्म्स आणि कंडीशन्स मान्य करून टिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
- आता तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड येईल. जो तुम्हाला वेबसाईटवर एंटर करावा लागेल.
- ओटीपीमुळे पीएनआर नंबर व्हेरिफाय करण्यात येईल आणि Cancel Ticket चा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर क्लिक करून तिकीट कॅन्सल करू शकता.
- तुमची रिफंड अमाउंट स्क्रीनवर दिसेल तसेच मोबाईल नंबर देखील मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही ओरिजिनल तिकीट काउंटरवर दाखवून रिफंड घेऊ शकता.