नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. अनेकांना आपत्कालीन परिस्थितीत मेडिकल साहित्यांची गरज भासत आहे. आरोग्य साहित्यांच्या पुरवठ्यासाठी रुग्णांचे नातेवाईक बेड्स, ऑक्सिजन सिलेंडरसह औषधांचा शोध घेत आहेत. रुग्णांना भेडसावणाऱ्या या समस्येवर ट्विटरनं नवं फिचर बनवलं आहे.
संकटाच्या या परिस्थिती अनेकांना Twitter, Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा आधार मिळत आहे. ते पाहता माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं त्यांच्या Advance Search Feature तयार केला आहे. जे युजर्सला ताजी माहिती आणि उपयुक्त साहित्यांपर्यंत पोहचण्यासाठी मदत करतील. जाणून घेऊया, ट्विटरवर याचा वापर आपण कसा करू शकता.
ट्विटरवर वेगाने आरोग्याशी निगडीत साहित्यांचा शोध
Twitter नं त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, संपूर्ण देशात twitter चा वापर केला जातो. ज्यामुळे ते ताजी माहिती आणि साहित्यांचा शोध घेऊ शकतात. ट्विटरवर मोठ्या संख्येने ट्विट केले जात आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकर सर्च करून मदत मिळू शकते हा आमचा प्रयत्न आहे. Advance Search Feature द्वारे ट्विट फिल्टर करता येऊ शकतात. उदा. यूजर्स स्पेसिफिक हॅशटॅग आणि वेळेनुसार सर्च फिल्टरचा वापर करू शकतो.
याशिवाय Twitter वर युजर्स असे ट्विट पाहू शकतो जे त्यांच्या आसपासच्या परिसरातील आहेत. यासाठी त्यांना निगडित हॅशटॅग वापरून एक ट्विट करावं लागेल त्यात Near You बटन टॅग करावं लागेल. या फिचर्सचा उपयोग करण्यासाठी Location ऑन असणं गरजेचे आहे.
लेटेस्ट ट्विट त्यांच्या टाईमलाईनवर सर्वात वर दिसतं. त्यासाठी युजर्सच्या त्यांच्या होम टाइमलाईनवर टॉपकडून उजव्या बाजूस स्पार्कल बटन वर टॅप करावं लागेल. कंपनीने हे पाऊन कोविड १९ संदर्भात सर्चसाठी उचललं आहे. यात रेमडेसिवीर इंजेक्शन, RTPCR टेस्टिंग, ऑक्सिजन सिलेंडर आणि हॉस्पिटल बेड्स याबाबत विविध माहिती उपलब्ध होऊ शकते.