Crossbeats ने भारतात नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो इयरफोन्स Crossbeats Epic Lite लाँच केले आहेत. हे इयरबड्स 12 तासांचा बॅटरी बॅकअप देतात, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने यात गेमर्ससाठी खास लो लेटन्सी मोड दिला आहे. चला जाणून घेऊया Crossbeats Epic Lite बड्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Crossbeats Epic Lite ची किंमत
Crossbeats Epic Lite TWS Earbuds ची 3,499 रुपये ठेवण्यात आले आहेत. हे बड्स सध्या कंपनीच्या वेबसाईटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. लवकरच हे इयरबड्स अॅमेझॉन इंडिया सह इतर ई-कॉमर्स वेबसाईटवरून Jet Black, Metro Silver आणि Urban Green कलर्समध्ये विकत घेता येतील.
Crossbeats Epic Lite चे स्पेसिफिकेशन्स
Crossbeats Epic Lite इयरफोन्समध्ये 11mm टाइटेनियम अलॉय ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे ड्रायव्हर्स 20Hz ते 20,000Hz पर्यंतच्या फ्रीक्वेंसीला सपोर्ट करतात, असे कंपनीने सांगितले आहे. यातील चार मायक्रोफोन कॉलिंग आणि नॉइज कॅन्सलेशनचे काम करतात. या बड्स मध्ये HFP, HSP, AVRCP, A2DP, AAC आणि SBC कोडॅक्स समवेत Bluetooth v5.2 कनेक्टिविटी सपोर्ट देण्यात आला आहे.
Crossbeats Epic Lite मध्ये हायब्रीड नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे, ज्यात Active Noise Cancellation, Ambient Mode आणि Normal Mode असे तीन मोड मिळतात. यातील इन्स्टंट ऑटो पेयरिंग ऑन करताच डिवाइसची कनेक्ट होतात. त्याचबरोबर Google Assistant आणि Siri voice assistant सपोर्ट देखील दिला आहे. गेमर्ससाठी Crossbeats Epic Lite इयरबड्समध्ये एक लो-लेटेंसी फीचर देण्यात आले आहे.
दोन्ही इयरबड्समध्ये टच सेन्सेटिव्ह कंट्रोल्स मिळतात, जे जेस्चरच्या मदतीने कॉल रिसिव्ह करणे आणि म्यूजिक कंट्रोल करण्याचे काम करू शकतात. यात IPX4 रेटिंग देण्यात आली आहे जी पाण्यापासून संरक्षण करते. यातील एक इयरबडमध्ये 45mAh आणि चार्जिंग केसमध्ये 500mAh बॅटरी आहे. दोन्ही मिळून 12 तासांचा प्ले-बॅक देऊ शकतात, असे कंपनीने सांगितले आहे.