सायबर फ्रॉड लोकांना लुटण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. अशा सायबर फसवणुकीपासून निरपराध लोकांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून सायबर दोस्त सोशल मीडिया अकाउंट चालवलं जातं. सायबर दोस्तने एक पोस्ट केली असून अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
सायबर दोस्तने पोस्ट केली आणि म्हटलं की, टेलिग्राम ग्रुप आणि चॅनेलपासून सावध राहा. ते तुम्हाला हाय रिटर्न देण्याचं वचन देऊन तुमचं कष्टाचे पैसे चोरू शकतात. यामध्ये अनेक हाय रिटर्न प्लॅनसाठी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत.पोस्टमध्ये सायबर मित्राने एक पोस्टरही शेअर केलं आहे. २५ हजार रुपये गुंतवा आणि ९९ हजार रुपये परत घ्या, असं मोठ्या शब्दांत लिहिलं आहे.
अनेक वेळा स्कॅमर युजर्सना बंपर ऑफर देऊन आमिष दाखवतात. तुम्हाला हा मेसेज, WhatsApp, टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्राप्त होऊ शकतो. याबाबत आपण सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. अशा आकर्षक फेक ऑफर देऊन स्कॅमर्स तुम्हाला फसवू शकतात.
सायबर स्कॅमर लोकांना हाय रिटर्न आणि इन्वेस्टमेंट प्लॅन सांगतात. अनेक प्रकरणांमध्ये, सायबर ठग सुरुवातीला लोकांना परतावा म्हणून काही पैसे देतात. यानंतर ते त्यांना आमिष दाखवून मोठी कमाई करण्यास प्रवृत्त करतात. यासाठी फेक मोबाईल ॲपचाही वापर केला जातो, ज्यामध्ये फेक प्रोफिट अमाऊंट दिसतं.
सायबर दोस्त हे गृह मंत्रालयाद्वारे चालवले जाणारे अकाऊंट आहे. सायबर फ्रॉडबाबत लोकांना जागरूक करणं हा यामागचा उद्देश आहे. यावर बऱ्याचदा लेटेस्ट सायबर फ्रॉडबाबत सांगितलं जातं आणि ते रोखण्याचा मार्ग देखील सांगतात.