स्वदेशी कंपनी Daiwa नं आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये वाढ केली आहे. कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये Cloud TV प्लॅटफॉर्मवर आधारित दोन टीव्ही लाँच केले आहेत. यातील Daiwa 32-inch (D32SM9) स्मार्ट टीव्हीची किंमत 11990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Daiwa 39-inch (D40HDR9L) मॉडेल 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हे दोन्ही मॉडेल HD Ready आहेत. 500 रुपये जास्त देऊन Voice Assistant सपोर्ट असलेले व्हेरिएंट विकत घेता येतील. हे दोन्ही स्मार्ट टीव्ही एक वर्षाच्या वॉरंटीसह येतात. कंपनी टीव्ही पॅनल्सवर एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील देत आहे. तुम्ही daiwa.in सह ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून यांची खरेदी करू शकता.
स्पेसिफिकेशन्स
Daiwa HD Ready Smart TV अँड्रॉइड 9 आधारित CloudTV OS वर चालतात. त्यामुळे यात Cloud TV Voice Assistant मिळतो, जो टीव्ही-रिमोटमधील बिल्ट-इन माईकच्या मदतीने वापरता येईल. यात The BIGWALL इंटरफेस देण्यात आला आहे. सोबत Amazon Prime Video, Disney+, Hotstar, Zee5, SonyLiv आणि Sun NXT सारखे लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्स मिळतात. या टीव्हीमधील मुव्ही बॉक्स अॅप विविध भाषांमधील 25 हजारांपेक्षा जास्त चित्रपट मोफत बघता येतील.
Daiwa चे दोन्ही स्मार्ट टीव्ही HD Ready डिस्प्लेसह येतात, जो 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन, A+ Grade Panel, Quantum Luminit Technology आणि 16.7 मिलियन कलरला सपोर्ट करतो. साऊंडसाठी कंपनीनं 20W स्टीरियो सराऊंड स्पिकर्सचा वापर केला आहे. हे दोन्ही टीव्ही A-53 क्वॉड-कोर प्रोसेसरवर चालतात. सोबत 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते. या टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, Wi-Fi, ईथरनेट आणि ऑप्टिकल आऊटपुट मिळतो.
हे देखील वाचा: