शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

डिलीट केलेला व्हॉट्स ॲप मेसेज परत मिळणार; चॅट लिस्टमध्ये स्टेट्स दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 7:27 AM

व्हॉट्स ॲप अनेक नवनवीन फिचर्सवर काम करत आहे. नवीन अहवालानुसार, व्हॉट्स ॲपमध्ये युजर्सना स्टेटस अपडेट्स चॅट लिस्टमध्येच दाखवले जातील.

नवी दिल्ली :

व्हॉट्स ॲप अनेक नवनवीन फिचर्सवर काम करत आहे. नवीन अहवालानुसार, व्हॉट्स ॲपमध्ये युजर्सना स्टेटस अपडेट्स चॅट लिस्टमध्येच दाखवले जातील. सध्या युजर्सना स्टेटस अपडेट्स पाहण्यासाठी वेगळ्या सेक्शनमध्ये जावे लागते. त्याच वेळी, दुसऱ्या फीचरमध्ये, वापरकर्त्यांना डिलीट केलेले संदेश रिकव्हर करण्याची संधीही मिळणार आहे.

व्हॉट्स ॲप वापरकर्ते आत्ता ॲप उघडतात तेव्हा त्यांना सर्वात अगोदर दिसते चॅट लिस्ट, जिथे एखाद्यासोबत शेअर केलेला शेवटचा मेसेज आणि मेसेज पाहिला की नाही याबाबतचे चिन्ह दाखवले जाते. 

मेसेज वाचलेला असल्यास स्टेटस निळ्या रंगाच्या टिकने दाखवले जाते. व्हॉट्स ॲपशी संबंधित बातम्यांचा मागोवा घेणाऱ्या डब्ल्यूबेटाइन्फो संकेतस्थळानुसार, आता त्यामध्ये बदल होणार असून आता प्रोफाइल फोटोभोवती एक वर्तुळ देखील दिसेल.

डिलीट केलेला मेसेज कसा मिळेल?एखाद्या यूजरने मेसेज डिलीट केला तर त्याला लगेच एक बार दिसेल ज्यामध्ये अनडूचा ऑप्शन क्लिक करून मेसेज पुन्हा मिळवू शकता. वेबसाइटनुसार, हा बार तेव्हाच उघडेल जेव्हा ॲपला कळेल की मेसेज डिलीट झाला आहे. डिलीट झालेला मेसेज पुन्हा प्राप्त करण्यासाठी यूजरकडे काही सेकंद असतील.काय करावे लागेल?तुम्हाला या फीचरची चाचणी करायची असल्यास,  व्हॉट्स ॲप बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करावी लागेल आणि ॲप गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करावे लागेल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इंटरनेटवरून नवीन बीटा एपीके देखील डाउनलोड करू शकता.

ऑनलाइन न येता व्हॉट्स ॲप चालवामेसेज व नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी फोन कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. आता फोनवर ऑनलाइन न येता लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून व्हॉट्स ॲप चालवता येणार. डेस्कटॉपवर व्हॉट्स ॲप चालवण्यासाठी फोन जवळ ठेवून कनेक्ट करावा लागत होता.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप