आजकाल सोशल मीडियाचा वापर आपण सर्वच जण करत आहोत. फेसबुक, ट्विटरसारख्यासोशल मीडियाचा वापरही आपण करत आहोत. आपण अनेकदा या प्लॅटफॉर्म्सवर रिव्ह्यूदेखील देत असतो. जर तुम्ही असं काही करत असाल तर पोलिसांनी एक इशारा दिला आहे. जर तुम्ही खराब वस्तू किंवा कोणत्या सर्व्हिसबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत असाल तर दिल्ली पोलिसांनी एक इशारा दिला आहे. ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या समस्या पोस्ट केल्यानंतर त्यामुळे आपली फसवणुकदेखील होऊ शकते. अशा तक्रारी केल्यानंतर काही स्कॅमर्स युझर्सना कस्टमर केअर एक्सिक्युटिव्ह बनून संपर्क साधतात. त्यानंतर त्यांची खासगी माहिती मिळवली जाते. यामुळे ना केवळ युझर्सचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी मिळू शकतो, इतकंच काय संबंधितांच्या खात्यातून पैसेही चोरले जाऊ शकतात. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती दिली आहे. तसंच त्यांनी सतर्क राहण्याचं आवाहनही केलं आहे. "फ्रॉड अलर्ट... तुम्ही सार्वजनिक मंचांवर आपल्या तक्रारी पोस्ट करता? जर तुम्ही वॉलेट, बँक अॅप्स आणि एअरलाईन्ससारख्या कंपन्यांना तक्रारी लिहित असाल तर तुमची फसवणुकही होऊ शकते. याद्वारे कोणतीही व्यक्ती त्या तक्रारींचा हवाला देऊन कस्टमर केअर एक्सिक्य़ुटिव्ह म्हणून तुम्हाला कॉल करू शकतो," असं दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रान्चनं म्हटलं आहे.
Facebook किंवा Twitter वर चुकूनही करू नका 'हे' काम; पोलिसांनी दिला इशारा
By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 2:57 PM
सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केल्यास बसू शकतो मोठा फटका
ठळक मुद्देदिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचनं ट्वीट करत दिली माहितीईमेलद्वारे किंवा कस्टमर केअर क्रमांकावर तक्रार करण्याचं पोलिसांचं आवाहन