मुंबई : टीआरएच्या मोस्ट डिझायर्ड ब्रँड्स २०२२ च्या अहवालात, सदर सिरीजमधील आठवा ब्रँड म्हणून सलग दुसऱ्या वर्षीही भारतामध्ये मोस्ट डिझायर्ड ब्रँड अर्थात सर्वाधिक खपाचा ब्रँड म्हणून डेल लॅपटॉप्सने स्थान पटकावले आहे. तर गॅजेटरी सुपर श्रेणी आणि मोबाईल श्रेणीमध्ये दुसऱ्या वर्षी आपले दुसरे स्थान MI ने टिकवून ठेवले आहे. भारतातील ३ रा मोस्ट डिझायर्ड ब्रँड म्हणून सॅमसंग मोबाईल फोनने पाचव्या स्थानावर झेप घेतली असल्याचे दिसून येते आहे.
ऑटोमोबाईल सुपर श्रेणीमध्ये गेल्या अनेक काळापासून पाय रोवलेल्या मारूती सुझुकीला मागे टाकत भारतातील चौथ्या सर्वाधिक खपाच्या ब्रँडमध्ये १४ वा क्रमांक पटकावत बीएमड्ब्ल्यूने बाजी मारली आहे. तर टीआरएच्या वार्षिक यादीत पाचव्या सर्वाधिक खपाच्या ब्रँडमध्ये अठराव्या स्थानावर टायटनने झेप घेऊन आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. अहवालामध्ये दरवर्षी भारतातील १००० सर्वाधिक खपाच्या ब्रँड्सची यादी तयार करण्यात येते.
१२७ वर्षीय जुना ब्रँड असणाऱ्या बाटाने मागील वर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी सुधारत सहाव्या स्थानावर झेप घेत २३ वे स्थान पटकावले आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सुपर श्रेणी आणि टेलिव्हिजन्स श्रेणीमध्ये असणाऱ्या अन्य अग्रगण्य एल.जी. टेलिव्हिजिन्सने सातवी जागा मिळविली असून चार क्रमांकाने वरची जागा मिळाली आहे. दरम्यान, आठव्या स्थानावर संपूर्ण भारतात यावर्षी अकरावी जागा पटकावत ह्युलेट पॅकार्ड लॅपटॉप्सने अत्यंत प्रभावी अशी उंची गाठली आहे.
या यादीत नवव्या स्थानावर सोनी टेलिव्हिजन्सने तर नुकत्याच आयपीओमध्ये प्रवेश केलेल्या एलआयसीने २१ जागेवरून प्रभावी भरारी घेत भारतातील १० व्या सर्वाधिक खपाच्या ब्रँडमध्ये जागा घेतली आहे. याबाबत टीआरए रिसर्चचे सीईओ एन. चंद्रमौली यांनी भाष्य केले आहे. मागील कोविडच्या दोन वर्षांमध्ये अनेक चढउतार निर्माण झाले आणि ग्राहकांचे प्राधान्य आणि समज बऱ्यापैकी बदलले आहे. ब्रँडवरील ग्राहकांच्या उत्सुकतेचे सर्वात महत्त्वाचे मोजमाप म्हणजे ग्राहकांची इच्छा आहे, कारण ग्राहकांच्या मनात खोलवर रूजलेल्या मानसिक - सामाजिक - सांस्कृतिक गोष्टींचे मोजमाप याद्वारे होत असते, असे एन. चंद्रमौली यांनी सांगितले.
याचबरोबर, मनातील इच्छा या इतक्या खोलवर रूजलेल्या असतात की, त्यांना धक्का देणे सहसा शक्य नसते, पण अनेक ब्रँड्सने ग्राहकांसह नवा बंध निर्माण करत कोविड काळाचा योग्यरित्या वापर करून घेतला आहे, असे एन. चंद्रमौली म्हणाले. दरम्यान, टीआरएच्या मोस्ट डिझायर्ड ब्रँड्स २०२२ च्या भारतातील सर्व ब्रँड्सच्या स्थानांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://trustadvisory.info/tra/categoryMDB22.php या वेबसाइटला भेट देऊ शकता.