अनेकांच्या घरात थर्मामीटर असलेलं तर आपण पाहिलंच आहे. परंतु सध्याच्या काळात अनेकजण आपल्या घरांमध्ये Pulse Oximeter बाळगत आहे. ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी जर तुम्ही ऑक्सिमीटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला एका ऑक्सिमीटरच्या बाबतीत माहिती देणार आहोत. डीटलप्रोनं परवडणाऱ्या किंमतीत एक ऑक्सिमीटर लाँच केलं आहे. पाहूया त्याबद्दल अधिक माहिती आणि काय आहेत त्यात स्पेसिफिकेशन.
सध्या कंपनीनं बाजारात आपला ऑक्सिमीटर उपलब्ध केला आहे. OLED डिस्प्ले असलेला डाय ऑक्सिप्रो ऑक्सिमीटर ९९९ रूपये + जीएसटीच्या किंमतीवर उपलब्ध आहे. यामध्ये एकदम योग्यरित्या SpO2 रिडींग दाखवलं जात असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याशिलाय https://detel-india.com/ या संकेतस्थळावरून ऑक्सिमीटर खरेदी करणाऱ्यांच्या कुटुंबातील ४ सदस्यांसाठी २ वेळा मोफत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधाही दिली आहेत.
काय आहेत विशेष बाबी ?डाय ऑक्सिप्रो हे डीटलप्रोच्या मेक इंडिया मोहिमेतील एक लेटेस्ट डिव्हाईस आहे. यामध्ये 2AAA बॅटरींचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय पाच सेकंदापर्यंत या ऑक्सिमीटरचा वापर न झाल्या तो आपणहून बंद होतो. OLED डिस्प्ले आणि एकाच फंक्शन कीसोबत या ऑक्सिमीटरचा वापर करणंही सोपं आहे.