Digilocker Uses : भारतातील लोकांजवळ अनेक कागदपत्रे असणे आवश्यक असते. या कागदपत्रांची कुठेतरी किंवा दुसऱ्या कामांसाठी गरज भासत असते. यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार कार्ड आणि पासपोर्ट सारखी कागदपत्रे महत्त्वाची आहेत. परंतु या सर्व कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती (फिजिकल कॉपी) नेहमी जवळ ठेवणे खूप कठीण आहे. कारण, जर एखादी ओरिजिनल कॉपी कुठेतरी हरवली तर मोठी अडचण निर्माण होते.
ओरिजिनल कॉपी पुन्हा बनवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे सध्या काही लोक ही कागदपत्रे डिजिटल स्वरूपात आपल्यासोबत ठेवतात. यासाठी भारत सरकारने २०१५ मध्ये डिजीलॉकर सेवा सुरू केली. तुम्हीही तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये ठेवू शकता. पण, काही कागदपत्रे अशी आहेत, जी तुम्ही डिजीलॉकरमध्ये सेव्ह करू शकत नाही. त्याबद्दल जाणून घ्या...
तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये ठेवू शकता. या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये भारत सरकारने मान्यता दिलेल्या कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक कागदपत्रे आणि मान्यता नसलेली कागदपत्रे ठेवू शकत नाही. डिजीलॉकर हे प्रामुख्याने सरकारी कागदपत्रांसाठी आहे. यामध्ये, तुम्ही खाजगी कंपन्यांचे करार किंवा तुमच्या कोणत्याही खाजगी पावत्या किंवा कोणत्याही प्रकारची अनौपचारिक कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये सेव्ह करून ठेवू शकत नाही.
याचबरोबर, तुम्ही डिजीलॉकरमध्ये अशी कोणतेही कागदपत्रे ठेवू शकत नाही, जी सरकारी मान्यताप्राप्त संस्थेने जारी केलेले नाहीत. याशिवाय, तुम्ही बँक खाते, एटीएम पिन, क्रेडिट कार्डची माहिती आणि अशा संवेदनशील माहितीशी संबंधित माहिती ठेवू शकत नाही. डिजीलॉकरमध्ये तुम्ही हस्तलिखित कागदपत्रे देखील ठेवू शकत नाही.