शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डिजिटल डिटॉक्स : तुमच्यावर पाळत ठेवणारे ‘ट्रोल फार्म्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 7:23 AM

Troll Farms : आपली मते, आपल्या मतांचे पाठीराखे, आपले विरोधक या कशातच आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नसते. एकुणात स्वातंत्र्याचा आभासच अधिक असतो.

इंटरनेट किंवा व्हर्च्युअल जग हे पूर्णपणे स्वतंत्र आहे का? तिथे आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य उपलब्ध असतं का? तर नाही! आपण जिथे मनमुराद बागडतो असे वाटते आणि जिथे आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते बोलता-लिहिता येते असे वाटते, तिथे तो सगळा निव्वळ आभास  असतो. आपली मते, आपल्या मतांचे पाठीराखे, आपले विरोधक या कशातच आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नसते. एकुणात स्वातंत्र्याचा आभासच अधिक असतो.

आपण काय बघायचे, काय ऐकायचे, आपल्याला काय दिसले पाहिजे या सगळ्याचे निर्णय अनेकदा दुसरेच कुणीतरी घेत असते. संपूर्ण माहितीही अनेकदा मॅनिप्युलेट केली जाते, म्हणजे आपल्यापर्यंत काय, कसे पोचावे यात प्रचंड हस्तक्षेप  असतो.  हे सगळे मॅनिप्युलेट करण्यासाठी जगभर निरनिराळ्या स्तरांवर काम केले जाते. ट्रोल करण्यासाठी अगणित संगणकांसमोर अनेक ट्रोल्सना बसविले जाते. अनेकदा ही माणसे नसतातच. ते असतात ट्रोलिंग बॉटस्. एक विशिष्ट टार्गेट ठेवून माहितीची तोडफोड केली जाते, एखाद्यावर कमेंट‌्सच्या माध्यमातून हल्ला चढविला जातो. हे सगळे ठरवून केले जाते आणि हे ज्या संस्थांमधून केले जाते त्यांना म्हणतात ट्रोल फार्म्स.

फ्रीडम हाउसने (फ्रीडम ऑफ द नेट २०१७) ६० देशांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यापैकी २२ देश अशा ट्रोल फार्म्सचा वापर ऑनलाइन चर्चेवर परिणाम करण्यासाठी, त्या चर्चेला आपल्याला हवे ते वळण देण्यासाठी करतात असे दिसून आले आहे. हे देश बाहेरच्या एजन्सीचा वापर करतात म्हणजे काय तर एखाद्या स्थानिक चर्चेलाही अपेक्षित वळण देण्यासाठी ट्रोल फार्म्समध्ये बसलेल्या ट्रोलर्सना किंवा बॉट‌्सना कामाला लावतात. केम्ब्रिज अनॅलिटिकाच्या निमित्ताने हे आपण बघितलेच आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) मते, २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के वापरकर्त्यांनी ऑनलाइन ट्रोलिंग झाल्याचं मान्य केलं आहे. YouGov ने २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४५ टक्के प्रौढांनी ट्रोल हा शब्द ऐकला असल्याचे दिसून आले आहे. ट्रोल कुणीही असू शकतात. आपल्या ओळखीचे आणि अनोळखीही. ट्रोल्सपासून वाचायचे कसे?  त्याबद्दल बघूया पुढच्या भागात.

- मुक्ता चैतन्य

(समाज माध्यमाच्या अभ्यासक)

muktaachaitanya@gmail.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया