भारतातील अनेक युझर्नना शुक्रवारी Disney+ Hotstar चं आपलं अकाऊंड ॲक्सेस करताना समस्या येत होती. Downdetector.in नुसार, ५०० हून अधिक युझर्सने Twitter वर आपल्याला Disney+ Hotstar चे अकाऊंट वापरता येत नसल्याची तक्रार केली होती. Disney + Hotstar च्या एकूण सबस्क्रायबर्सची संख्या सध्या सुमारे ५ कोटी आहे. तथापि, भारतातील युझर्सना Disney+ Hotstar वर लॉग इन करण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान, काळी वेळानंतर ही समस्या दूर करण्यात आली आणि युझर्सना त्यांचा अकाऊंट ॲक्सेसही करता येऊ लागला.
भारतात आणि जगभरात सर्वाधिक पाहिलेले स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar शुक्रवारी १७ डाऊन झाल्याचे दिसून आले. एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सामना सुरू होता आणि दुसरीकडे The Night Manager देखील रिलीज होणार होती. दरम्यान, अनेक युझर्सने यानंतर ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती.
प्लॅनची किंमत काय?Disney+ Hotstar मोबाईल प्लॅनची किंमत ४९९ रुपये आहे. तुम्हाला ४९९ रुपयांमध्ये एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळेल. यामध्ये तुम्ही डिस्ने + हॉटस्टार एकाच वेळी एकाच मोबाईलमध्ये पाहू शकता. त्याच वेळी, त्याचे सुपर सबस्क्रिप्शनची किंमत वार्षिक ८९९ रुपये आहे. यामध्ये तुम्ही एकाच वेळी दोन स्क्रीनवर डिस्ने प्लस हॉटस्टारचा आनंद घेऊ शकता. तर Hotstar च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये 4K स्ट्रीमिंगचाही आनंद घेता येईल. यामध्ये एकाच वेळी ४ जण डिस्ने प्लस हॉटस्टारचे कार्यक्रम पाहू शकतात. या प्लॅनची एका महिन्याची किंमत २९९ रुपये आणि एका वर्षासाठी हा प्लॅन १४९९ रुपयांना घेता येणार आहे.