ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नियम आणण्याची तयारी चालविली आहे. त्यानुसार मोबाइल कॉलर आयडीमध्येच बदल करण्यात येत असून, त्यामुळे बनावट नंबर गायब होतील. सध्याच्या काॅलर आयडी पद्धतीत बदल हाेणार असल्याचे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सूताेवाच केले हाेते.
केवायसी प्रणाली करणार लागूट्रायसोबत एक नवीन प्रणाली तयार करण्यात येणार आहे. नव्या प्रणालीत कॉल करणाऱ्यांचा मोबाइल नंबरसह त्याचा फोटोही दिसेल. त्यासाठी सरकार केवायसी प्रणाली लागू करणार आहे. यात दोन व्यवस्था लागू राहतील. एक म्हणजे आधार कार्ड आधारित आणि दुसरी सिम कार्ड आधारित.
मोबाइल क्रमांक आधारशी लिंकआधार कार्ड आधारित नवीन प्रणालीनुसार सर्व मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक केले जातील. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने कॉल करताच, मोबाइल क्रमांकासह त्याचे नावदेखील दिसेल. आधार कार्डमध्ये जे नाव असेल तेच नाव यात दिसेल.
ट्रू-कॉलरपेक्षा वेगळी यंत्रणाट्रू-कॉलर किंवा इतर कॉलर आयडी ॲपमध्ये नाव दिसण्याची व्यवस्था असली तरी यूजरने स्वतः टाकलेले नाव त्यात दिसते. यूजरने चुकीचे नाव टाकल्यास तेच ट्रू-कॉलर दाखविते. सरकारच्या नवीन प्रणालीत हा दोष असणार नाही. आधारवरील नावच दिसेल.
सिम कार्ड आधारित यंत्रणासिम कार्ड आधारित प्रणालीत, नवीन सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकास फोटो आणि ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे द्यावी लागतील. त्याआधारे कॉलिंगसोबत लोकांचे फोटो जोडले जातील, त्यामुळे बनावट कॉल कोणी केला, हे ओळखणे सोपे होईल. याचाच अर्थ ग्राहकाने सीम कार्ड खरेदी करताना जो फोटो कंपनीला सादर केला असेल, तो त्याने केलेल्या काॅलसोबत दिसून येईल.
असा होईल फायदा सूत्रांनी सांगितले की, नवी ओळख प्रणाली कार्यान्वित होताच, अनोळखी नंबरवरून आलेला कॉलही कोणाचा आहे, हे कळेल. कॉल कोण करतंय, हे स्वीकारणाऱ्यास फोटोसह कळेल. कॉल करणारा व्यक्ती आपली वैयक्तिक ओळख लपवू शकणार नाही. त्यामुळे फसवणुकीला आळा बसू शकतो.