Realme च्या सब-ब्रँड Dizo नं आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. या ब्रँड अंतर्गत नवीन Dizo Watch S ची भारतात एंट्री झाली आहे. या वॉचमध्ये SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात. 20 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या या वॉचची किंमत देखील सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
स्पेसिफिकेशन्स
कंपनीनं मेटल फ्रेमसह आयताकृती डिस्प्ले दिला आहे. Dizo Watch S मध्ये 1.57-इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले कर्व्ड ग्लास आणि 200x320 पिक्सल रिजोल्यूशनसह मिळतो. स्मार्टवॉच IP86 रेटेड असल्यामुळे, पाणी आणि धुळीचा यावर परिणाम होत नाही. यात हार्ट रेट सेन्सर, स्लिप मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मोजण्यासाठी SpO2 सेन्सर देण्यात आला आहे.
स्मार्टवॉचमध्ये 110 पेक्षा स्पोर्ट्स मोड आहेत. यात स्टेप काउंट, कॅलरी बर्न आणि डिस्टन्सच्या आधारावर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक रिपोर्ट तयार केला जातो. यातील 200mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 10 दिवसांची बॅटरी लाईफ आणि 20 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.
Dizo Watch S ची किंमत
Dizo Watch S ची किंमत 2,299 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत यावर डिस्काउंट देखील दिला जात आहे. त्यामुळे हे वॉच मर्यादित कालावधीसाठी 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची विक्री 26 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या माध्यमातून करण्यात येईल. कंपनीनं या वॉचचे क्लासिक ब्लॅक, गोल्डन पिंक आणि सिल्वर ब्लू, असे तीन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.