नवी दिल्ली: गुगल कंपनी क्रोम ब्राऊजरला नवीन Chrome 76 सोबत अपग्रेड करणार आहे. गुगल हे अपडेट 30 जुलैला रिलीज करणार आहे. गुगलचे म्हणणे आहे की, या नवीन अपडेटसह क्रोम यूजर्संना प्रायव्हसीमध्ये पहिल्यापेक्षा बदल करून अधिक चांगले बनविले जाईल. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, Incognito Modeमध्ये यूजर्सच्या अॅक्टिव्हिटी वेबसाइट्सद्वारे ट्रॅक केले जातेय. या समस्यांचा विचार करून गुगल Chrome 76 अपडेट घेऊन येत आहे.
जाणून घ्या काय होणार आहे बदल:
- गुगल क्रोम आता सर्व साइट्ससाठी Adobe Flash आता बाय डिफॅाल्ट डिसेबल राहील. यूजर्स अनेबल करू शकतील, पण फ्लॅशचा वापर फक्त क्लिक टू प्ले मोडमध्येच करता येईल.
- क्रोम 76 आल्यानंतर जर यूजर्सने डार्क मोड चालू ठेवला असेल तर साइट्स ऑटोमॅटिकली यूजर्सला डार्क थीमसोबत कनेक्ट दाखवेल. काही वेबसाइट्स फाइल सिस्टम एपीआई रिक्वेस्ट पाठवून यूजर्सच्या Incognito Modeला डिटेक्ट करता येत होती जी आता या मोडमुळे डिसेबल राहणार आहे. तसेच काही वेबसाइट्स या ट्रिकच्या सहाय्याने Incognito Modeमध्ये राहणाऱ्या यूजर्सला ब्लॅाक करायच्या. कारण याच्या सहाय्याने वेबवर पेवॉलला बायपास करण्यासाठी सोपे होते. नवीन अपडेटमध्ये गुगल या समस्येला दूर करेल.
- क्रोम ओएसवर जास्त तर यूजर्स नोटिफिकेशनला साफ करत नाहीत. कारण गुगल Clear All हे ऑप्शन सर्वात खाली आहे.
- परंतु या अपडेटमुळे हे बदलून Clear All हे ऑप्शन वरती असणार आहे.