नवी दिल्ली : डॉमिनोज इंडिया (Domino's India) वर मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे. प्रसिद्ध असलेल्या पिझ्झा आउटलेटवर सायबर हल्ला करून 13 जीबीचा अंतर्गत डेटा (Internal Data) चोरल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आयटी, लीगल, फायनान्स, मार्केटिंग, कर्मचाऱ्यांच्या माहितीसह ऑपरेशन्सच्या माहितीचा सुद्धा समावेश आहे.
हॅकर्सचा दावा आहे की, ही माहिती त्यांना18 कोटी ऑर्डर डिटेल्सच्या मदतीने मिळाली आहे. ज्यामध्ये ग्राहकांचे (Customers) फोन क्रमांकं (Phone numbers), ई-मेल आईडी (Email id), पेमेंट डिटेल्स (Payments details), डेबिड (Debit) आणि क्रेडिट (Credit) कार्डच्या माहितीचा समावेश आहे. यामध्ये साधारण 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स डार्क वेबवर गेल्याची माहिती समोर आली आहे.
डॉमिनोज इंडियाच्या या यादीमध्ये अशा ग्राहकांचे नाव आहे, ज्यांनी App वरून ऑर्डर केली आहे. इस्रायली सायबरक्राइम इंटेलिजन्सचे सहसंस्थापक एलन गल (Alon Gal) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. दरम्यान, डॉमिनोज इंडियाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
एलन गल यांचा दावा आहे की, डॉमिनोज इंडियाचा हॅक झालेला डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी आहे आणि हॅकर्स यासाठी चार कोटी रुपयांची मागणी करत आहेत. तसेच, हॅकर्स हा डेटा फक्त अशा विक्रेत्याला विकणार आहेत की, ज्यासाठी एक सर्च पोर्टल देखील तयार केले जात आहे, ज्याद्वारे डेटाबद्दल माहिती मिळू शकते.
(आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज?)
बिटकॉइनच्या माध्यमातून अघोषित किंमतीवर विकली जाते माहितीअशा प्रकारचा डेटा डार्क वेबवर बिटकॉइन (Bitcoin)या क्रिप्टोकरन्सीद्वारे अघोषित किमतीला विकला जात आहे. या डेटासाठी हॅकर्स टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टँडर्डचा (PCIDSS) वापर करते. हॅकर कार्ड फिंगरप्रिंट बनवण्यासाठी हॅश अल्गोरिदमचा (Hash Algorithm) वापर करू शकतात,तर ते मास्क्ड कार्डनंबरही डिक्रिप्ट (Decrypt) करू शकतात. अशा परिस्थितीत सगळ्याच कार्डधारकांची खाती धोक्यात येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सायबर हल्ले चार वर्षात दहापटींनी वाढलेस्टॅटिस्टावर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2020 पर्यंत भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 70 कोटी होती. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात ही संख्या 97.4 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे, विशेष म्हणजे भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या इतकी आहे की जगातील बर्याच विकसित देशांची लोकसंख्याही एवढी नाही. या अहवालानुसार, 2017 मध्ये भारतात 53,117 सायबर हल्ले झाले होते. 2018 मध्ये त्यात वाढ होऊन एकूण 2,08,456 सायबर हल्ले झाले. 2019 मध्ये या हल्ल्यांची संख्या 3,94,499 एवढी होती. ऑगस्ट 2020 पर्यंत सायबर हल्ल्यांची संख्या 6,96,938 इतकी होती.