ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहक स्मार्टफोन्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स ऑनलाईन विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत. याला कारणीभूत असलेला एक घटक म्हणजे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर मिळणारा ईएमआय ऑप्शन. रिटेल स्टोर्सवर देखील हा पर्याय मिळेल. दर महिन्याला खूप कमी रक्कम द्यावी लागत असल्यामुळे हा पर्याय खूप आकर्षक वाटतो. परंतु योग्य पर्याय न निवडल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
ऑनलाईन खरेदी करताना 3 ते 36 महिन्यांच्या EMI चा पर्याय स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळतो. यावर 12 ते 18 टक्के वार्षिक व्याज देखील बँकेकडून आकारण्यात येतं. कालावधी जास्त असेल तर व्याजाचं प्रमाण जास्त असतं. कधी कधी ही रक्कम हजारोंमध्ये जाते. तर कमी कालावधीच्या ईएमआय आणि थेट खरेदीच्या रकमेत इतका फरक जाणवणार नाही.
EMI वर फोन घेऊच नयेत का
साध्या EMI ऑप्शनवर व्याज द्यावं लागत त्यामुळे अन्य पर्याय उपलब्ध नसतील तर याची निवड करावी. परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर No-Cost EMI चा ऑप्शन देखील मिळतो. जो एक चांगला पर्याय आहे. परंतु तरीही स्मार्टफोन सारखे प्रोडक्ट ईएमआयवर विकत घेऊ नयेत. कारण या डिव्हाइसेसची व्हॅल्यू वेळेनुसार कमी होत जाते. तसेच हप्ता चुकल्यास तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो. काही फायनान्स कंपन्या सॉफ्टवेयरच्या स्मार्टफोनचा वापर देखील करू देत नाहीत. या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्या बजेटनुसार स्मार्टफोन घेणं केव्हाही चांगलं.
हे देखील वाचा:
आता येणार मजा! 20 हजारांच्या आत येतोय Vivo चा 5G Phone; फ्लिपकार्टवर होणार 5000mAh बॅटरीसह विक्री
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...