नवी दिल्ली - आपल्या सोबत असे अनेकवेळा घडले असेल की, आपण लायसन्स घरी विसरलात आणि बरोबर अशाच वेळी वाहतूक पोलिसांनी आपल्या गाडीची चेकिंग केली तथा चलन फाडले. एवढेच नाही, तर आपल्या कडे गाडीची इतर कागदपत्रे नसतील तर चलनाची रक्कमही वाढत जाते. आता आपल्यासोबत असे घडू नये यासाठी आम्ही एका अशा अॅपची माहिती देणार आहोत, जे आपला चलनापासून बचाव करेल. तसेच आपल्याला गाडीची इतर कागदपत्रेही ठेवावी लागणार नाहीत.
डिजी लॉकर अॅप -डिजीलॉकर किंवा डिजिटल लॉकरच्या मदतीने आपण व्हर्च्युअल डॉक्युमेंट्सचा सहजपणे वापर करू शकता. हे एक सरकारी अॅप असून, आपण यावर आपल्या वाहनाची कागदपत्रे सेव्ह केल्यास, चेकिंग दरम्यान आपल्या वाहनाचे चलन कापले जाणार नाही. विशेष म्हणजे हे अॅप वापरासाठी अत्यंत सोपे आहे. तसेच सध्या बरेच लोक या अॅपचा वापरही करत आहेत.
हे एक डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे. आपण येथे आपली कागदपत्रे जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी, पॉलिसी डॉक्युमेंट आदी स्टोअर करू शकता. यासाठी आपल्याला एक स्वतंत्र क्लाउड स्टोरेज स्पेसदेखील मिळेल, जो तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेला असेल.
या चार सोप्या स्टेजचा वापर करून आपण ऑनलाइन डिजिलॉकर ओपन करू शकता... -स्टेज 1 - डिजिलॉकर वेबसाइटवर जा. आपल्याला डिजिलॉकर digilocker.gov.in वर अॅक्सेस करता येईल. आपण प्ले/अॅप स्टोअरवरूनही आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमाने अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. याशिवाय, आपण डिजिलॉकर वेबसाइटवर जाऊन डिजिटल लॉकर खाते तयार करण्यासाठी आधार नंबरचा उपयोग करू शकता. यासाठी आपला फोन नंबर आधारशी लिंक असायला हवा.
स्टेज 2 - 'साइन अप'वर क्लिक करा. आपले संपूर्ण नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर (जो आधारसी लिंक आहे.) टाका. एक पासवर्ड तयार करा आणि एक ईमेल आयडी टाका
स्टेज 3 - आपला आधार क्रमांक टाका. यानंतर आपल्याला दोन पर्याय येतील, एक असेल- वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आणि दुसरा असले- फिंगरप्रिंट, पुढे जाण्यासाठी आपण कुठलाही पर्याय निवडू शकता.
स्टेज 4 - वापरकर्त्याचा आयडी - एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला 'वापरकर्त्याचे नाव' आणि 'पासवर्ड' तयार करावा लागेल. हे टाकल्यानंतर, साइन-अप बटनवर क्लिक करा. खाते यशस्वीपणे तयार झाल्यानंतर, अॅप्लिकेशन डिजिलॉकरची 'डॅशबोर्ड' स्क्रीन दाखवेल.